Tuesday, April 13, 2021 | 12:54 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर
रायगड
03-Mar-2021 05:33 PM

रायगड

अलिबाग । शहर प्रतिनिधी

महात्मा फुले ए.सी कॉलेज पनवेल येथे कुस्ती निवड चाचणी स्पर्धा रविवारी (दि.28)रोजी पार पडल्या. कार्याध्यक्ष मा.सुभाष घासे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्विकारून जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी सर्व कुस्तीगीर व विशेष करून ए. सी. कॉलेजचे प्राचार्या, सर व स्टाफ यांच्या सहकार्याने यशस्वी झाल्या.

स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य गणेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. मॅटचे पुजन सर चिटणिस मारूती आडकर यांनी केले. अलिबाग तालुक्याचे अध्यक्ष जयद्रथ भगत यांनी स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळली. स्पर्धेचे बक्षिस वितरण पनवेल तालुक्याचे अध्यक्ष मा.बळिराम पाटील व संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष घासे यांच्या हस्ते करण्यात आले. कर्जत संघटनेचे जिल्हा सदस्य दिपक भुसारी, जिल्हा सदस्य जयराम गवते, जिल्ह्याचे खजिनदार दत्तात्रय पालांडे, सदस्य सुनील नांदे, पनवेल संघटनेचे अशोक पाटील उपस्थित होते. भालचंद्र भोपी यांनी कुस्तीचे समालोचन केले. पंच कमिटीमध्ये युवराज पाटील, सचिन म्हात्रे, जायनाथ पाटील, गणेश पाटील होते.

यावेळी गादी विभागात 57 किलो संकेत कुंभार खालापुर, 61 किला साजन पावशे पनवेल, 65 किलो प्रणय सुतार अलिबाग, 70 किलो सुनिल खंदाळे खालापुर, 74 किलो किरण ढवळे पनवेल, 79 किलो सचिन भोपी पनवेल, 86 किलो ओंमकार शिंदे कर्जत, 92 किलो ओंमकार पवार खालापुर, 97 किलो कुलदीप पाटिल अलिबाग, महाराष्ट्र केसरी गट 125किलो अंकुर घरत अलिबाग तर माती विभागासाठी 57 किलो श्रीनाथ पाटिल अलिबाग, 61 किलो सुहास भगत अलिबाग, 65 किलो रोशन धुळे कर्जत, 70 किलो मनोज ठाकुर रोहा, 74 किलो जयेश खरमारे खालापुर, 79 किलो शुभम वरखडे पनवेल, 86 किलो यश कडवे अलिबाग, 92 किलो ओंकार निंबळे खालापुर, 97 किलो ऋषिकेश देशमुख खालापुर, महाराष्ट्र केसरी गट 125 किाले कुणाल शेळके पनवेल यांची निवड झाली आहे. या निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाकडून व संघटनेचे अध्यक्ष बाळाराम पाटिल यांचा कडून अभिनंदन करण्यात आले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top