Friday, March 05, 2021 | 05:58 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

रायगड जिल्हा अंजिक्यपद किशोर गट कबड्डी स्पर्धा
रायगड
23-Feb-2021 03:15 PM

रायगड

गडब । वार्ताहर ।

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन व सुरेश खैरे मित्र मंडळ, काळभैरव ग्रामस्थ मंडळ नांदगाव यांच्या विद्यमाने संत नामदेव माध्यमिक विद्यालय नांदगाव-सुधागड येथे घेण्यात आलेल्या रायगड जिल्हा किशोर, किशोरी गट अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत किशोरी गटात राजमाता जिजाऊ कळंबोली संघाने, तर किशोर गटात जय बजरंग रोहा संघाने अजिंक्यपद मिळविले.

या स्पर्धेत किशोरी गट मुली अंतिम सामना  राजमाता जिजाऊ कळंबोली विरुद्ध कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल या संघात झाला. या सामन्यात कळंबोली संघाने 41 विरुद्ध 23 महणजेच 18 गुणांनी सामना जिंकून अंजिक्यपद मिळविले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक राजमाता जिजाऊ कळंबोळी, द्वितीय कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल, तृतीय क्रमांक भालचंद्र उरण, चतुर्थ क्रमांक टाकादेवी मांडवा या संघांना पारितोषिके देण्यात आली.

तर किशोर गट मुलांमध्ये जय बजरंग रोहा संघाने अजिंक्यपद मिळविले, तर द्वितीय क्रमांंक बालयुवक पेझारी, तृतीय क्रमांक नवजीवन पेझारी, चतुर्थ क्रमांक जय हनुमान उचेडे यांनी मिळविले. विजयी संघांना रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, हिराचंद पाटील, छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे, सूर्यकांत ठाकूर, दीपक मेहता, संतोष कारगे, जे.जे. पाटील, गजानन मोकल, संजय मोकल, जनार्दन पाटील, उल्हास पाटील, सुहास पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेत पंच प्रमुख रवींद्र म्हात्रे, सहाय्यक पंचप्रमुख गुरुनाथ शेरमकर यांनी काम पाहिले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top