Wednesday, May 19, 2021 | 01:15 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

माणगावमधील क्रीडा संकुलासाठी 83 कोटींची तरतुद
रायगड
02-Apr-2021 05:08 PM

रायगड

। अलिबाग । प्रतिनिधी ।

कोकण विभागाचे विभागीय क्रीडा संकुल नवी मुंबई येथे उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. परंतु नवी मुंबई परिसरात या संकुलासाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध होणे शक्य न झाल्याने क्रीडा राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कल्पनेतून विभागाचे क्रीडा संकुल मध्यवर्ती झाल्यास कोकण विभागातील सर्वच खेळाडूंना याचा लाभ होईल, असा विचार मांडला  त्यानुषंगाने नाणोरे येथे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्याचबरोबर हे क्रीडा संकुल उभारण्यासाठी रु.2 कोटी 40 लक्ष निधी जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांच्या अधिनस्त ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

नाणोरे येथील क्रीडा संकुलासाठी 10.00 हेक्टर (24 एकर) शासकीय जागा विभागीय क्रीडा संकुल, कार्यकारी समिती, मुंबई विभागाच्या नावावर करण्यात आली आहे. या संकुलासाठी 83 कोटी 44 लाख 16 हजार रुपयांचे अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने मान्यता दिली आहे.

संकुलात या गोष्टींचा समावेश 

शासनाच्या मान्यताप्राप्त अंदाजपत्रकानुसार विभागीय क्रीडा संकुलामध्ये 400 मी.सिंथेटीक धावपथ, फुटबॉल मैदान, अ‍ॅथलेटिक्स पॅव्हेलियन बिल्डिंग, हॉकी मैदान चेंजिग रूमसह, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी मैदाने, टेनिस कोर्ट, चेंजिंग रुम, आऊटडोर गेम, अंतर्गत रस्ते, इनडोअर हॉल, जलतरण तलाव, डायव्हींग तलाव, संरक्षण भिंत, मुले-मुली वसतिगृहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग व बोअरवेल, फिल्टरेशन प्लँट, जलतरण व डायव्हींग तलाव, मटेरियल टेस्टींग व रॉयल्टी चॉर्ज, जीएसटी, विद्युतीकरण, पाणी व्यवस्था, क्रीडांगण समपातळीकरण व इतर सुविधायुक्त बाबींचा यामध्ये समावेश आहे.

कोकण विभागात मुंबई ते सिंधुदूर्ग या परिसरातील अनेक खेळाडूंना रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणार्‍या या क्रीडा संकुलामुळे विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविण्यास नक्कीच सहाय्य होईल. 

- अदिती तटकरे, पालकमंत्री

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top