Tuesday, April 13, 2021 | 01:58 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी प्रतीक्षा शेरकर हिची निवड
रायगड
28-Feb-2021 05:29 PM

रायगड

। म्हसळा । वार्ताहर ।

सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने 4 ते 8 मार्च रोजी श्रीनगर येथे होणार्‍या वरिष्ठ गट राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून पनवेलची सुकन्या प्रतीक्षा शेरकर हिची निवड करण्यात आली आहे.

नुकत्याच जळगाव येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून प्रतीक्षा हिची निवड झाल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल रायगड सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षा तथा पनवेल मनपा नगरसेविका सीता पाटील, सचिव स्वप्नील वारंगे, खजिनदार हेमंत पयेर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी प्रतीक्षा हिचे कौतुक केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top