Wednesday, May 19, 2021 | 03:03 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

नववी राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धा
रायगड
25-Mar-2021 03:54 PM

रायगड

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनने नववी राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धा इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम पोलो ग्राऊंड श्रीनगर येथे दि.24 ते 31 मार्चदरम्यान आयोजित केली असून, यामध्ये महाराष्ट्रातून 126 जणांची निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, परवेझ अहमद महापौर, श्रीनगर महापालिका अधिकारी, नुझहत अरा महासचिव जम्मू काश्मीर स्पोर्ट्स कौन्सिल इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशन डायरेक्टर जनरल मोहम्मद इक्बाल, जनरल सेक्रेटरी मुफ्ती हमीद यासीन व खजिनदार इरफान भुट्टो यांच्या हस्ते पार पडले.

पिंच्याक सिल्याट हा इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ असून,तो स्टँडिंग (फाईट), तुंगल (सिंगल काताज), रेग्यु (ट्रिपल काताज) व गंडा (डेमो फाईट) या चार प्रकारात खेळला जातो. हा खेळ देशात युवती, महिला, विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी लोकप्रिय होत आहे. याला युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्‍वविद्यालय संघ ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशियाची मान्यता आहे. शालेय व अखिल भारतीय पोलीस खेळ महासंघाच्या खेळात समावेश झाला आहे. या खेळाचा देशभरात प्रचार व प्रसार व त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी श्रीनगर इनडोर स्पोर्ट् स्टेडियम पोलो ग्राऊंड येथे नववी राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये देशभरातून 2400 खेळाडू सहभागी होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पिंच्याक सिल्याट संघाची गेल्या दहा वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी असून, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवून तो प्रथम क्रमांकावर आहे. या खेळामध्ये अनेक खेळाडूंना आपले भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top