Wednesday, May 19, 2021 | 02:23 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पनवेलमध्ये राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्य स्पर्धा
रायगड
08-Mar-2021 04:36 PM

रायगड

पनवेल | प्रतिनिधी

राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या 25 व्या सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रात पहिल्यांदाच करण्यात आले असून हा मान पनवेलकरांसाठी पर्वणीच ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये या स्पर्धा केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थानसारख्या ठिकाणी घेतल्या जात होत्या, मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये देशभरातून 26 राज्यातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला.

आज पार पडलेल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे हे आले होते.

यावेळी पहिल्या सत्रातील विजेत्यांना कांस्य, रजत आणि सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने समोर आलेली बाब म्हणजे या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार्‍या टॉपर खेळाडूंचे क्रमांक हे मायक्रो सेकंदाच्या फरकाने मागेपुढे आहेत. त्यामुळे जरी हे स्पर्धक 1, 2 किंवा 3 र्‍या क्रमांकावर असले तरीही त्यांनी घेतलेली मेहनत त्यांना प्रथम क्रमांकाचा दर्जा देत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top