Tuesday, April 13, 2021 | 02:01 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

माऊली संघ कै. प्रकाश गायकर चषकाचा मानकरी
रायगड
02-Mar-2021 06:11 PM

रायगड

चौल | प्रतिनिधी

श्री गणेश सेवा मंडळ तळवली (मुंबई), तळवली-सुडकोली यांच्या वतीने कै. प्रकाश धर्मा गायकर यांच्या स्मरणार्थ 60 किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद श्री साई माऊली (मुंबई) संघाने, तर श्रीराम क्रीडा मंडळ, नवखार संघाने उपविजेतेपदावर नाव कोरले. माघी गणेशोत्सवाचे निमित्त व सत्यनारायणाच्या पूजेचे औचित्य साधत दि. 14 व 15 फेबु्रवारीदरम्यान प्रकाशझोतात ही स्पर्धा खेळविण्यात आली.

या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अंतिम सामन्यात श्री साई माऊली (मुंबई) संघाने कै. प्रकाश गायकर स्मृतीचषक 20121 चषकावर नाव कोरले, तर श्रीराम क्रीडा मंडळ नवखार हा संघ उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक डोलवी संघ, तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी कै. प्रकाश गायकर मित्रमंडळ पेझारी हा संघ ठरला. या स्पर्धेत रासळ या संघाची शिस्तबद्ध संघ म्हणून निवड करुन या संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या संघाला 25,001/- रोख व चषक, तर उपविजेत्या संघास 15,001/- रोख व चषक, तृतीय क्रमांकास 7001/- रोख व चषक, चतुर्थ क्रमांकास 7001/- व चषक देऊन गौरविण्यात आले. 

या स्पर्धेचे समालोचन गणेश पाटील यांनी केले. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, खेळाडूंसह सामने पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांच्या भोजनाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली होती. माघी गणेशोत्सव सोहळा व कबड्डी सर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गणेश सेवा मंडळ व महिला मंडळ तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व सभासद यांचे सहकार्य लाभले. 

स्पर्धा यशस्वीपपणे पार पाडण्यासाठी गणेश सेवा मंडळाचे आधारस्तंभ वसंत हिराजी भुरे, मंडळाचे अध्यक्ष डी.जे. गायकर, शैलेश माळी, मंडळाचे सर्व पदाधिकारी, सहकारी, ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी मेहनत घेतली.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top