Tuesday, April 13, 2021 | 01:03 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

महाराष्ट्राच्या मुलांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
रायगड
25-Mar-2021 03:52 PM

रायगड

 

। मुंबई । प्रतिनिधी ।

महाराष्ट्राच्या मुलींनी सिक्कीमचा 88-17 असा धुव्वा उडवीत 47व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तेलंगणातील सूर्यापेठ येथे या स्पर्धेच्या बाद फेरीला सुरुवात झाली. महाराष्ट्राने सुरुवातच अशी झोकात केली, की सहा मिनिटातच दोन लोण देत 18-00 अशी आघाडी घेतली. सातव्या मिनिटाला सिक्कीमला पहिला गुण मिळाला तेव्हा गुण फलक 21-01 असा होता. या सामन्यात महाराष्ट्राने पूर्वार्धात चार व उत्तरार्धात तीन असे एकूण सात लोण प्रतिस्पर्ध्यांवर दिले. मध्यांतराला महाराष्ट्राकडे 48-09 अशी आघाडी होती.शुभम पटारेने चढाईत 10 गुण, तर पकडीत 5गुण घेत अष्टपैलू कामगिरी केली. आकाश रुडालेने चढाईत 9, तर पकडीत 1 गुण घेतला. तेजस पाटीलने चढाईत 11, तर पकडी तीन गुण वसूल केले. आदित्य शिंदे, निलेश शिंदे, रोहित बिन्नीवाला, शुभम दिडवाघ यांचा देखील खेळ उत्तम झाला. आज महाराष्ट्राचा बचाव भक्कम होता.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top