Tuesday, April 13, 2021 | 12:57 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

मच्छिंद्र स्मृती ठरला आर.के. ट्रॉफीचा मानकरी
रायगड
28-Feb-2021 05:24 PM

रायगड

। उरण । वार्ताहर ।

कै. सूरज घरत स्मृती आयोजित आर.के. ट्रॉफी 2021 या मर्यादित क्रिकेट सामन्यांचे आयोजन सागर घरत व रवी शेठ सामाजिक मंडळ वहाळ यांच्या वतीने रमण घरत नगरी वहाळ येथील मैदानावर करण्यात आले होते. 

सदर सामन्याचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते झाले. तर, दुसर्‍या दिवशी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे व गायक संतोष चौधरी उर्फ दादूस यांनी, तर शेवटच्या दिवशी खा. सुनील तटकरे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राष्ट्रवादी सरचिटणीस प्रशांत पाटील, साई देवस्थानचे अध्यक्ष रवी पाटील, उरण विधानसभा अध्यक्षा भावना घाणेकर, उरण अध्यक्ष मनोज भगत, लिगल सेल जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. पवन कुमार गायकवाड, अ‍ॅड. विशाल पाताडे, अ‍ॅड. सुयोग मोलाणे, अ‍ॅड. सागर शिंदे, बाळाराम पाटील, अरुण दापोलकर आदी उपस्थित होते.

या सामन्यामध्ये 32 संघांनी सहभाग घेतला होता. यावेळी आर.के. ट्रॉफी प्रथम क्रमांक मच्छिंद्र स्मृती दारावे संघाने दोन लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले. तर, उपविजेता विठ्ठल संघ जासई एक लाख रुपये, तर तृतीय जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी संघास 50 हजार व चतुर्थ मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाने 40 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. या सामन्यामध्ये मालिकावीर दारावे संघाचा धीरज भोईर स्कुटर, उत्कृष्ट गोलंदाज धीरज म्हात्रे मोरावे सायकल, उत्कृष्ट फलंदाज तकदीर पाटील बामण डोंगरी सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सचिन ठाकूर जासई यांना सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेत पंच म्हणून जय पवार, राजेंद्र भोईर यांनी काम पहिले, तर समालोचक कुणाल दाते, प्रवीण गायकर, हरिष मोकल, दीपक पाटील, स्कोरर सचिन पाटील, प्रणय म्हात्रे तर निवेदन म्हणून मो.का. मढवी यांनी काम केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top