Wednesday, May 19, 2021 | 02:20 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

महाजने आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ
रायगड
30-Jan-2021 06:20 PM

रायगड

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील महाजने येथील श्री महाजनाई स्पोर्टस् क्लबच्यावतीने दोन दिवसीय महाजने चषक 2021 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी, दि30 जानेवारी रोजी उसर येथील मैदानात झाला.

यावेळी बेलोशी ग्रामपंचायातीचे सरपंच कृष्णा भोपी, सदस्य गिरीश पाटील, राकेश भोपी, सदानंद पाटील,माजी सदस्य संजय पारंगे,विनायक भोनकर,प्रकाश पारंगे,शशीकांत पाटील, प्रशांत खानावकर, अंकीत पारंगे,पांडूरंग पारंगे आदी मान्यवर श्री महाजनाई स्पोर्टस क्लबचे पदाधिकारी,सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.जय हनुमान घोटवडे आणि कुंठ्याची गोठी अभय स्पोर्ट उद्घाटनीय सामना झाला. यात कुंठ्यांची गोठी संघ विजयी ठरला. या स्पर्धेत सुडकोली ते कुरुळ विभागातील 24 आमंत्रित संघाने सहभाग घेतला आहे. प्रथम क्रमाकास रोख 12 हजार रुपये व चषक द्वीतीय क्रमांकास रोख 8 हजार रुपये व चषक तृतीय क्रमांकास रोख 4 हजार रुपये व चषक देऊन गौरविले जाणार आहे.तसेच उत्कृष्ठ गोलंदाज उत्कृष्ठ फलंदाज सामनावीरास चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. बक्षीस समारंभ रविवारी,दि.31 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास होणार असल्याची माहीती आयोजकांनी दिली.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top