Tuesday, April 13, 2021 | 12:20 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा
रायगड
24-Mar-2021 04:54 PM

रायगड

-

। मुंबई । प्रतिनिधी ।

  सूर्यपेठ,तेलंगणा येथे सुरु असलेल्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी चुरशीच्या लढतीत मध्यप्रदेशचा 49-47 असा,तर मुलींनी केरळचा 61-22 असा पराभव करीत 47व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. 

  मुलांच्या इ गटात महाराष्ट्राने सलग 3 गुण घेत सुरुवात झोकात केली.पण नंतर मात्र तो जोश राखण्यात ते कमी पडत चालले. त्याचा फायदा घेत मध्यप्रदेशच्या खेळाडूंनी 15 व्या मिनिटाला महाराष्ट्रावर लोण देत 22-17 अशी आघाडी घेतली. मध्यांतराला 25-20 अशी मध्यप्रदेशकडे आघाडी होती. उत्तरार्धात महाराष्ट्राने लोणची परतफेड करीत नाममात्र आघाडी घेतली पण ती फार काळ ठिकली नाही.उत्तरार्धातील 13व्या मिनिटाला दुसरा लोण देत एम.पी.ने पुन्हा आघाडी घेतली.शेवटची 5मिनिटे पुकारली तेव्हा 43-39अशी आघाडी मध्यप्रदेशकडे होती.शेवटच्या पाच मिनिटात मात्र महाराष्ट्राने आक्रमते बरोबरच त्याला संयमाची जोड देत मध्यप्रदेशवर दुसरा लोण देत आघाडी घेतली.ती टिकवीत 2 गुणांनी विजय साकारला.महाराष्ट्राच्या विजयात शिवम पटारे,आदित्य शिंदे, रोहित बिन्नीवाले यांनी चमकदार खेळ केला.मुलींच्या  ह  गटात महाराष्ट्राने केरळचा 61-22 असा धुव्वा उडवीत विजयी सलामी दिली. पूर्वार्धात 31-18अशी भक्कम आघाडी घेणार्‍या महाराष्ट्राने उत्तरार्धात देखील तुफानी खेळ करीत 39 गुणांच्या मोठ्या फरकाने विजय साकारला. मानसी रोडे, समृद्धी कोळेकर, हरजितसिंग कौर यांच्या झंजावाती खेळा पुढे केरळचा टिकाव लागला नाही. कालच्या दुर्घटनेचा कोणताच परिणाम आज स्पर्धेवर जाणवला नाही.

 इतर निकाल संक्षिप्त :- मुले 1)साई वि.वि.बिहार -अ गट (87-24); 2)हरियाणा  वि.वि.जे  के - ड गट (74-12); 3)चंदिगढ वि.वि. पाँडेचारी - ह गट (58-13); 4)कर्नाटक वि.वि.  - ब गट (49-33); 5)दिल्ली वि.वि. चंदिगढ - क गट (46-45).

मुली :-1)साई वि.वि. तेलंगणा - ब गट (70-23).

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top