Saturday, March 06, 2021 | 12:27 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कोंढवी पळचिल संघ ठरला विजेता
रायगड
22-Feb-2021 05:42 PM

रायगड

पोलादपूर । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जिल्हा परिषद, नपा व मनपा क्षेत्र) या नोंदणीकृत संघटनेतर्फे यंदा प्राथमिक शिक्षकांसाठी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असता अंतिम सामन्यामय्ये कोंढवी पळचिल केंद्र संघाने कापडे देवळे केंद्र संघावर मात करीत विजेतेपदाचा चषक पटकाविला.

पारितोषिक वितरणसोहळयांमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी तालुक्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी विविध गुणदर्शन सोहळयाचे आयोजन करणार्‍या शिक्षक संघटनेतर्फे यंदा प्रथमच शिक्षकांसाठी क्रिकेट स्पर्धांचे आगळेवेगळे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेप्रसंगी तालुक्यातील सर्व केंद्रांतील प्राथमिक शिक्षकांनी सहभाग घेऊन क्रिकेट खेळातील प्राविण्य सादर केले.

पोलादपूर तालुका मर्यादित प्राथमिक शिक्षकांच्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेसाठी विजेत्या कोंढवी पळचिल केंद्र संघास 5001 रूपये व चषक, उपविजेता कापडे देवळे केंद्र संघास 3001 रूपये व चषक, तृतीय पारितोषिक कोतवाल बुद्रुक केंद्र संघास 2001 रूपये व चषक तर पोलादपूर तुभेॅ केंद्र संघास चौथ्या क्रमांकाचे 1001 रूपये व चषक अशी पारितोषिके महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या पोलादपूर शाखेतर्फे देण्यात आली. यावेळी कोंढवी केंद्राचे शरद थोरात हे शिक्षक मालिकावीर ठरले. कापडे केंद्राचे अशोक शेळवणे उत्कृष्ट फलंदाज चषकाचे मानकरी ठरले तर पळचिल केंद्राचे अमोल शिंदे हे उत्कृष्ट गोलंदाज ठरले आहेत. कापडे केंद्र रामकृष्ण जगताप उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी देण्यात आली.

पारितोषिक वितरणप्रसंगी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील विविध कला क्रिडा आणि गुणांना वाव देण्यासाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे लवकरच लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. याप्रसंगी व्यासपिठावर पोलादपूर पंचायत समिती सदस्य यशवंत कासार यांच्यासह शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, कॅप्टन विष्णू नारायण सावंत, कार्यवाह विजय पवार, केंद्रप्रमुख शिवाजी महाडीक, पंकज निकम, अरूण मोरे, सचिन खोपडे, वैभव कांबळे, सचिन दरेकर, मंगेश चिले, बालाजी गुबनरे, दीपक साळवी, भिकाजी मांढरे तसेच पोलादपूर तालुक्यातील शिक्षक परिषदेचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top