Tuesday, April 13, 2021 | 12:30 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल अजिंक्य
रायगड
28-Feb-2021 04:55 PM

रायगड

। गडब । वार्ताहर ।

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन गावदेवी क्रीडा मंडळ मुढांणी यांच्या विद्यमाने पेण तालुक्यातील मुंढाणी येथे घेण्यात आलेल्या रायगड जिल्हा कुमारी गट अंजिक्यपद कबड्डी स्पर्धेत कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल संघाने राजमाता जिजाऊ संघाचा पराभव करुन कुमारी गटाची जिल्हा अजिंक्यपदाची हॅट्ट्रिक मारली.

या स्पर्धेतील अंतिम सामना कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल विरुद्ध राजमाता जिजाऊ कळंबोली या संघात झाला. सुरुवातीपासूनच पनवेल संघाने या सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. पनवेल संघाच्या रश्मी पाटील हिने अष्टपैलू खेळ केला, तर चढाईपटू रचना म्हात्रे हिने आक्रमक चढाया करत एकाच चढाईत तीन गडी मिळवत कळंबोली संघावर लोण दिला. मध्यांतरापर्यंत पनवेल 14 गुण, तर कळंबोली 8 गुण असा गुणफलक होता. मध्यांतरानंतर कळंबोली संघाची सोनम साळुंखे हिने एकाच चढाईत तीन गुण मिळवून सामन्यात चुरस निर्माण केली. परंतु, तिचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर हा सामना पनवेल संघाने 23-15 असा जिंकून अजिंक्यपद मिळविले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल, द्वितीय क्रमांक राजमाता जिजाऊ पनवेल, तृतीय दिलखुष आवास, चतुर्थ क्रमांक टाकादेवी मांडवा या संघांनी पटकाविला. स्पर्धेचे पारितोषक वितरण सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भोईर, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष हिराचंद पाटील, सूर्यकांत ठाकूर, गजानन मोकल, सहकार्यवाह जे.जे. पाटील, संजय मोकल, लक्ष्मण गावंड, सदस्य जनार्दन पाटील, उल्हास पाटील, सुहास पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत पंचप्रमुख म्हणून नरेश पाटील यांनी काम पाहिले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top