Wednesday, May 19, 2021 | 02:13 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

जेसीसी पिंगळसई संघाची बाजी
रायगड
28-Jan-2021 04:03 PM

रायगड

। खांब-रोहे । वार्ताहर ।

तालुक्यातील मुठवली खु.येथे विभागीय शिव छत्रपती क्रिक्रेट असो.च्या वतीने व जय भवानी क्रीडा मंडळ मुठवली खु.यांच्या वतीने संपन्न झालेल्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांत जेसीसी पिंगळसई या संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करून बाजी मारली.

या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन पत्रकार नंदकुमार मरवडे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, ग्रा.पं.सदस्य तुळशीराम शेळके,माजी सदस्य मारूती तुपकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते योगेश शेळके,राजेश शेळके, तुकाराम शेळके,गणेश शिंदे,महेश तुपकर,मंगेश तुपकर,सुनील शेळके,धनराज शिंदे,रोहिदास तुपकर,संदेश तुपकर आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत लांढर या संघाने उपविजेतेपद पटकावले तर तृतीय जय भवानी गावठाण या संघाने पटकावला.तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून विवेक शिंदे,उत्कृष्ट गोलंदाज सौरभ,क्षेत्ररक्षक ओमकार कदम व मालिकावीर म्हणून महेश बारस्कर यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top