Saturday, March 06, 2021 | 01:12 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

जय महाराष्ट्र कोशिंबळे संघाला अंतिम विजेतेपद
रायगड
22-Feb-2021 05:28 PM

रायगड

माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या सौजन्याने नाक्यावरचा कट्टा  क्रिकेट क्लब खरवली  संघाने रविवार दि.21 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत  जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब कोशिंबळे संघाने अंतिम सामन्यात यजमान नाक्यावरचा कट्टा खरवली  संघावर मात करीत प्रथम क्रमांकचे रोख पारितोषिक 10000 रुपये व आकर्षक चषक पटकाविला. सदर स्पर्धेत असोसिएशनचे 16 संघ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

माणगाव तालुक्यातील लहाने सुरव येथील मैदानावर नाक्यावरचा कट्टा  क्रिकेट क्लब खरवली संघाने  स्पर्धेचे चांगल्या पद्धतीने आयोजन केले होते. या स्पर्धेत  व्दितीय  क्रमांकाचे विजेते यजमान नाक्यावरचा कट्टा खरवली  संघास रोख 7000 रुपये व आकर्षक चषक,तृतीय क्रमांकाचे विजेते कमांडर क्रिकेट क्लब बामणोली  संघास रोख 5000 रुपये व आकर्षक चषक,  चतुर्थ क्रमांकाचे विजेते श्री काळभैरव क्रिकेट क्लब उणेगाव संघास रोख 3000 रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

तसेच वैयक्तिक पारितोषिकांमध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून कमांडर क्रिकेट क्लब बामणोली संघाचा खेळाडू निलेश उभारे,उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जय महाराष्ट्र कोशिंबळे  संघाचा शिवम बक्कम तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिला जाणारा  मालिकावीराचा  बहुमान जय महाराष्ट्र कोशिंबळे  संघाचा  खेळाडू राहुल बक्कम यांनी पटकावला.

या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.स्पर्धेचे विजय बक्कम व योगेश पवार यांनी मराठीतून धावते समालोचन केले.सदर स्पर्धेच्या उदघाटन व  पारितोषिक वितरण समारंभाला खरवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महादेव खडतर,प्रशांत राजपूरकर,बाळू अंबुर्ले,विनोद सुतार,रुपेश कोळेकर,संतोष जाधव,नारायण जाधव,रघुनाथ खडतर,किरण धुमाळ,मनोज राजपूरकर,रामचंद्र वेदक,अजित सकपाळ, किरण मुंढे,शरद सकपाळ,राहुल दसवते,अध्यक्ष समीर पवार, मछिंद्र म्हस्के, वैभव मोरे, निलेश उभारे,योगेश भोनकर,तुषार करकरे आदी उपस्थित होते.हि स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी  असोसिएशनच्या सर्वच पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top