Tuesday, April 13, 2021 | 01:52 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बबन झोरे यांची निवड
रायगड
21-Mar-2021 04:28 PM

रायगड

 

 

। नेरळ । प्रतिनिधी ।

  भारत सरकारच्या क्रीडा विभागाकडून झारखंड येथे झालेल्या ऑल इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील बबन झोरे यांनी दोन सुवर्णपदके मिळवली असून त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.कर्जत तालुक्यातील खैराट गावातील बाबू झोरे यांचे सुपुत्र बबन झोरे यांनी झारखंड येथे ऑल इंडिया पॉवरलेफ्टिंग स्पर्धेत देशातील 28 घटक राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश यामध्ये झालेल्या सामन्यात दोन सुवर्णपदक मिळवली असून उत्तम यश संपादन केल आहे.तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून या स्पर्धेत बबन झोरे हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.या कामगिरीमुळे बबन झोरे यांनी कर्जत चे नाव संपूर्ण भारतात नावलौकिक केलं असल्याने सर्वच स्तरावरून त्यांचं कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top