Wednesday, May 19, 2021 | 02:37 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सुवर्णपदक विजेत्या आर्यन पाटीलचा सत्कार
रायगड
02-Mar-2021 06:29 PM

रायगड

माणगाव | वार्ताहर

छत्तीसगढ येथे झालेल्या 18 वर्षाखालील राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत उंच उडी खेळ प्रकारात  आर्यन अरुण पाटील याने सुवर्णपदक पटकावून रायगड जिल्ह्यासह पेण व माणगाव तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल आर्यनचा अमित कॉम्प्लेक्स रहिवासी मंडळाकडून सत्कार करण्यात आला.

आर्यन हा मूळचा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रावे गावचा रहिवासी असून, सध्या माणगाव अमित कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास आहेत. आर्यनने राष्ट्रीय मैदानी खेळ स्पर्धेतील उंच उडी खेळ प्रकारात सुवर्णपदक पटकावून आपली चमक राष्ट्रीय स्तरावर छत्तीसगढ येथे दाखविली. त्याच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून माणगाव अमित कॉम्प्लेक्स रहिवासी मंडळाकडून त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी घाग, सदस्य वैभव आंब्रे, भानुदास पाटील, रविकिरण पालवे, संदेश पानसरे, अंकुश काळे, सुरेश ससाणे, मित्र परिवार समीर उकिर्डे, संग्राम उकिर्डे, रणजित बावणे, सुजल घाग, महेश बासंबेकर आदी उपस्थित होते.

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top