Wednesday, May 19, 2021 | 02:09 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

फ्रेंड्स ग्रुप साई संघाला अंतिम विजेतेपद
रायगड
27-Jan-2021 06:56 PM

रायगड

  । माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव  क्रिकेट असोसिएशन यांच्या सौजन्याने उतेखोल क्रिकेट क्लब  माणगाव ब संघाने रविवार दि 24  जानेवारी  रोजी  आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत फ्रेंड्स  ग्रुप साई  संघाने अंतिम सामन्यात आझाद क्रिकेट क्लब माणगाव संघावर मात करीत प्रथम क्रमांकचे रोख पारितोषिक 10000 रुपये व आकर्षक चषक पटकाविला.सदर स्पर्धेत असोसिएशनचे 16 संघ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील तीनबत्ती नाका संघाच्या मैदानावर उतेखोल क्रिकेट क्लब  माणगाव ब संघाने  स्पर्धेचे चांगल्या पद्धतीने आयोजन केले होते.या स्पर्धेत  द्वितीय क्रमांकाचे विजेते आझाद क्रिकेट क्लब माणगाव ठरला.तृतीय क्रमांकाचे विजेते स्पार्टन माणगाव तर  चतुर्थ क्रमांकाचे विजेते यजमान उतेखोल ब माणगाव संघाने पटकविला. तसेच वैयक्तिक पारितोषिकांमध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून फ्रेंड्स ग्रुप साई  संघाचा वलिद बंदरकर,उत्कृष्ट गोलंदाज म्हणून फ़्रेंड्स ग्रुप साई संघाचा  रिहान गोडमे,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आझाद माणगाव संघाचा सुहेब जामदार  तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिला जाणारा  मालिकावीराचा  बहुमान  आझाद माणगाव  संघाचा रिहान परदेशी  यांनी पटकावला.या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस समारंभाला राजिपचे  माजी सभापती अँड.राजीव साबळे,नितीन दसवते,सचिन बोंबले,सुनील पवार,दिपक थळकर,रमेश मढवी,दत्त बोडेरे,दिपक लांगे,मारुती बोडेरे, रोशन जाधव,रमेश जाधव,अविनाश पाटील,गणेश जाधव,फहद करबेलकर,रुपेश बोडेरे आदी मान्यवरांसह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य  उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top