सुधागड-पाली 

परळी ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून आदिवासी बांधव व ज्यांचे हातावर पोट आहे अशा गरजू लोकांना श्रीमद् रामचंद्र ज्ञान आश्रम, घोटवडे  यांच्या सहकार्याने नुकताच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सरपंच संदेश कुंभार, उपसरपंच प्रवीण कुंभार, ग्रामसेवक ए. एम. खेडकर, सर्व सदस्य व सदस्या तसेच ग्रामपंचायत हद्दीतील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते हे वारंवार जनतेला कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय काय करायला हवे ते सांगताहेत.

ग्रामपंचायतीने कोरोनापासून बचाव करण्यासंबंधी सुरूवातीपासूनच काळजी घेतली असून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे. परळी हद्दीतील कोणतीही जनता उपाशीपोटी राहू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली आहे. सरपंच संदेश कुंभार यांनी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ठेकेदारांची बैठक घेऊन त्यांच्याकडे काम करणारे स्थानिक व परप्रांतातून आलेले कामगार यांची काळजी घेण्याची  सूचना केली. रास्त भाव धान्य दुकानदारांची देखील बैठक घेऊन सर्व शिधापत्रिका धारकांना व्यवस्थित धान्य वाटप करण्याच्या सूचना केल्या.  लाक डाऊनमध्ये कुणाला काही अडचण आलीच तर निसंकोच लोकांनी संपर्क करावा असे आवाहन सरपंच संदेश कुंभार यांनी जनता मंचशी बोलताना केले. सरपंच संदेश कुंभार सर्व परिस्थितीवर जातीने लक्ष ठेवून निर्जंतुकीकरण करताना ते स्वतः उपस्थित होते. एवढेच नव्हे तर गोंदाव फाटा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांच्या भोजनाचीही जबाबदारी त्यांनी उचलली आहे.

 

अवश्य वाचा