Friday, March 05, 2021 | 05:45 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

बाहे येथील क्रिकेट सामन्यात शिरवली संघ अंतिम विजेता
रायगड
22-Feb-2021 05:32 PM

रायगड

गोवे-कोलाड । प्रतिनिधी ।

रोहा तालुक्यातील  गावदेवी बाहे आयोजित  क्रिकेट सामन्यात रॉयल किंग शिरवली  संघ ठरला अंतिम विजेता अंतिम सामना शिरवली व धाकेश्‍वर देवकान्हे यांच्यात झालेल्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर रॉयलकिंग शिरवली  संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला तर देवकान्हे संघाला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.तसेच स्पर्धेतील तृतीय क्रमांक गावदेवी नडवली हा संघ मानकरी ठरला. उत्कृष्ट सामनावीर शिरवली संघाचा संकेत लहाने स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज देवकान्हे संघाचा विश्‍वनाथ थिटे, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून शिरवली संघाचा संघाचा सौरभ शिंदे  गौरविण्यात आले .

खांब विभागीय क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने गावदेवी बाहे यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धा निसर्गरम्य महिसदरा पत्राच्या किनार्‍यावरील प्रांगणात क्रिकेट सामन्याचे उद्घाटन ग्राम पंचायत देवकान्हे सरपंच वसंत भोईर, ग्राम पंचायत गोवे नवनिर्वाचित सरपंच युवकांचे स्फुर्तीस्थान महेंद्र पोटफोडे,देवकान्हे उपसरपंच सुरज कचरे, अनंत थिटे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र राऊत, सदस्या अदिती थिटे, बाळा भोईर, राजेश सुटे, सुनील थिटे सर, नंदकुमार मरवडे ,नारायण कान्हेकर,डॉ श्यामभाऊ लोखंडे,विलास थिटे, ज्ञानेश्‍वर भोईर,प्रदीप गोविलकर, अनिल जाधव, लिंबाजी थिटे, संतोष जाधव,आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी प्रवीण गोविलकर,अनिल जाधव, जगदीश थिटे, शिवाजी साळसकर, मनोज थिटे, रोशन ठाकूर, विजय नाकटे, पांडुरंग भोईर, सूरज साळसकर,विश्‍वास माठल, रुपेश बामुगडे,रोहित देवकर, मनेश थिटे,प्रतीक थिटे, स्वप्नील चव्हाण, किरण जाधव,सचिन थिटे,मंगेश साळसकर, पांडुरंग भोईर,ज्ञानेश्‍वर थिटे(मोरया डीजे) व मंडळाचे पदाधिकारी युवक व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top