Friday, March 05, 2021 | 07:19 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

माणगाव क्रिकेट स्पर्धेत उतेखोल  ब संघाला अंतिम विजेतेपद
रायगड
22-Feb-2021 05:36 PM

रायगड

माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव  क्रिकेट असोसिएशन यांच्या सौजन्याने आझाद  क्रिकेट क्लब  माणगाव संघाने रविवार दि.21फेब्रुवारी  रोजी  आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत  उतेखोल माणगाव ब संघाने अंतिम सामन्यात फ्रेंड्स ग्रुप   क्रिकेट क्लब साई संघावर मात करीत प्रथम क्रमांकचे रोख पारितोषिक 10000 रुपये व आकर्षक चषक पटकाविला. सदर स्पर्धेत असोसिएशनचे 16 संघ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते..

माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील तीनबत्ती नाका संघाच्या मैदानावर आझाद   क्रिकेट क्लब  माणगाव संघाने  स्पर्धेचे चांगल्या पद्धतीने आयोजन केले होते.या स्पर्धेत द्वितीय   क्रमांकाचे विजेते फ्रेंड्स ग्रुप   क्रिकेट क्लब साई संघास रोख 7000 रुपये व आकर्षक चषक,तृतीय क्रमांकाचे विजेते आय्यान क्रिकेट क्लब माणगाव  संघास रोख 5000 रुपये व आकर्षक चषक,चतुर्थ क्रमांकाचे विजेते यजमान आझाद  क्रिकेट क्लब  माणगाव संघास  रोख 3000 रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

तसेच वैयक्तिक पारितोषिकांमध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून फ्रेंड्स ग्रुप साई  संघाचा आक्रमक शैलीचा फलंदाज वलिद बंदरकर,उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आय्यान  क्रिकेट क्लब माणगाव  संघाचा फय्याज अखवारे,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून उतेखोल माणगाव मब मसंघाचा खेळाडू शशी मराठे  तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिला जाणारा  मालिकावीराचा  बहुमान  उतेखोल माणगाव ब संघाचा नितेश जोरकर  यांनी पटकावला.या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस समारंभाला रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे,ममहामूद धुंद्वारे,सरफराज अफ़वारे,लियाकत  परदेशी,दिनेश रातवडकर, फैमिद जामदार,अनंता थळकर,रिहान मुल्ला, उमर परदेशी,युनूस गजगे,समालोचक मंगेश पाटील,निखिल मोरे,अतुल फडतरे,सिद्धेश पिंगळे,दीपक म्हशीलकर,मोहन रातवडकर,आराध्य धारिया,वसीम शेख,साकिब बडे,अमीर नदाफ, फहद करबेलकर,रुपेश बोडेरे आदी मान्यवरांसह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य  उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top