रायगड
माणगाव । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात क्रिकेटचा अतिरेक झाला असून आता शनिवार व रविवार नव्हे तर आठवड्याचे सातही दिवस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन क्रिकेट खेळाडू करताना दिसत आहेत.जिल्ह्यात क्रिकेटचा पुरता कहर झाला असून या स्पर्धांना बक्षिसे देण्यासाठी देणगीदार मात्र पुरते हैराण झाले असून ते बस्स झाले क्रिकेट स्पर्धा आमचे बक्षिसे देवून कंबरडे मोडले असल्याचे प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगत आहेत.
या क्रिकेट स्पर्धामुळे तरुणांना. काही एक कामधंदा सुचत नसून रोज सकाळी उठायचे,क्रिकेटचे कपडे घालायचे, बूट घालायचे,हातात बॅट घेवून घराबाहेर पडायचे हेच दृश्य सर्वत्र पहायला मिळत आहे. काही गावांतून आठ, दहा खेळाडू एकत्र येतात व अगदी 50 हजार रुपयांपासून लाखो रुपयांच्या स्पर्धा आयोजित करतात.त्यामध्ये 32 संघांना सहभागी करून घेतात.तीन ते चार दिवस या स्पर्धांचे आयोजन केले जाते.50 हजार रुपये बक्षिसाला 5 हजार रुपये प्रवेश फी तर 1 लाख रुपये बक्षिसाला 10 हजार रुपये प्रवेश फी घेतली जाते.शिवाय आयोजक आपला स्वतःचा संघ तुल्यबळ करून आपला संघ एका बाजूने वर काढतो. त्यामुळे स्पर्धेतील पहिला किंवा दुसरा नंबर त्यांचा नक्कीच ठरलेला असतो .
त्यातच संघ कमी आले तर एखाद्या हरलेल्या संघाची पुन्हा प्रवेश फी घेवून त्यांना प्रवेश दिला जातो. या स्पर्धा आयोजित करताना बर्याचदा दरवर्षी तेच- तेच देणगीदार यांना हे आयोजन करणारे गाठत असल्याने ते पुरते हैराण झाले आहेत.या क्रिकेट स्पर्धामुळे काही एक साध्य होताना दिसत नाही.वीस वर्षापुर्वीचा क्रिकेट व आताचा क्रिकेट यामध्ये जमीन आसमानाचा फरक जाणवत आहे.पुर्वी छोट्या रक्कमाची बक्षिसे असतानाही खेळ म्हणून क्रिकेट खेळला जायचा.मात्र आताचा क्रिकेट पाहिला तर अनेक ठिकाणी सामने ठरवून व्यवसाय रुपाने स्पर्धा खेळली जात आहे.त्यामुळे जुन्या पिढीतील क्रिडा रसिकांनी क्रिकेट पाहण्याकडे पाठ फिरवली आहे.
कोणत्याही सामाजिक कार्यात आताचे क्रिकेट खेळणारे तरुण पुढे येत नाहीत.हे तरुण टेनिस क्रिकेट खेळत असल्याने जिल्हा बाहेर कोणी चमकत नाही.यांचा क्रिकेट खेळ हा एकप्रकारे
व्यवसाय झाला आहे.
वारंवार क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करायचे व त्यातून नफा मिळवून नंतर जेवण्याच्या पार्ट्या किंवा बाहेरगावी फिरायला जायचे हेच चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.आता तर काही गावांतून प्रथम चार क्रमांकाचे बक्षिसे तसेच वैयक्तिक बक्षिसे व बाँलचे बॉक्स देणारे देणगीदार मिळाल्यानंतरही घरोघरी जाऊन क्रिकेट स्पर्धेचे आयोजक दोनशे,पाचशे वेळेला शंभर रुपये घेताना दिसतात. अति क्रिकेटमुळे ग्रामीण भागातील तरुण फार आळशी झाले आहेत.त्यांना खेळ हाच सर्वस्व वाटत असून ते काम धंद्याचा विचारच करत नाहीत.क्रिकेटच्या अतिरेकेमुळे आता देणगीदार क्रिकेट बस्स झाले असे बोलत आहेत. कोरोनाने सर्वत्र थैमान घातल्याने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठा फटका बसला आहे.
त्यातून सावरण्याचा सर्वजण प्रयत्न करीत असताना ग्रामीण भागात झालेल्या क्रिकेट स्पर्धांचे झालेल्या दैनंदिन आयोजनमुळे खास करून लोकप्रतिनिधींचे कंबरडे मोडले असून ते नकोरे बाबा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असे बोलत या क्रिकेटला आवरा असे सांगून लॉकडाऊनमुळे स्पर्धा बंद होत्या त्या बर्या होत्या असे म्हणण्याची वेळ आता देणगीदारांवर आली आहे.