महाड 

निसर्ग चक्रीवादळा मध्ये अनेक गावांचा वीजेचा पुरवठा खंडीत झाला आहे,वादळाने वीजेची व्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेल्याने पाऊण महिना होऊनही अनेक गावांमध्ये वीज पुरवठा सुरु झालेला नाही.वीज नसलेल्या गावांमध्ये दिवा बत्तीची व्यवस्था होण्यासाठी शासना कडून केरोसिनचे मोफत वाटपाला सुरवात केली आहे.परंतु स्वस्त धान्य दुकानदारां कडून लाभार्थाना पाच लिटर ऐवजी तीन लिटरचे वाटप करीत असल्याची तक्रार लाभाथ्र्या कडून केली जात आहे.

 महाड तालुक्यात दुर्गम भागांत चक्रीवादळाचा तडाखा अधिक बसल्याने गावा गावांमध्ये घरांचे,गोठ्याचे प्रचंड नुकसान झाले,त्याच बरोबर वीजेचे खांब,तारा वादळाने तुटल्यामुळे अनेक गावांतुन वीज पुरवठा खंडीत झाला आहे.वितरण वैंपनी कडून वीज पुरवठा सुरु करण्याचे सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेंत परंतु पाऊण महिना होऊनही अनेक गावांना आजही वीजेचा पुरवठा सुरु झालेला नाही.ज्या गावांमध्ये वीज नाही अश्या गावांमध्ये दिवा बत्तीची व्यवस्था होण्या साठी शासनाने कार्ड धारकांना केरोसिनचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला असुन त्या प्रमाणे केरोसिनचे वाटप सुरु झाले असल्याची माहिती महाड पुरवठा विभागा कडून देण्यांत आली.महाड तालुक्यांतील 3विभागांमध्ये केरोसिनचे वाटप करण्यांत येत असताना बिरवाडी विभागांतील 3 गावे,वहूर विभागांतील 3 गावे,विन्हेरे विभागांतील 16 गावे,कुबळे विभागांतील 4 गावांसह ग्रामिण भागांतील वीज नसलेल्या गावांना केरोसिनचे मोफत वाटप करण्यांत येत आहे.

नाते रायगड विभागांतील अनेक गावांमध्ये आजही वीजेचा पुरवठा पुर्ववत झालेला नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.पाऊण महिन्या पासुन गावे अंधारा मध्ये आहेंत,दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे.अखेर शासनाने किमान दिवाबत्तीची सुवीधा उपलब्द होण्यासाठी कार्ड धारकांना केरोसिन वाटप करीत आहे.या साठी शासन निर्णया प्रमाणे प्रत्येक कुटूंबांना पाच लिटर केरोसिन देण्यात यावे असे आदेश देण्यांत आलेले असताना प्रत्यक्षांत लाभार्थाना तीन लिटर केरोसिन दिले जात असल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे येत असल्याची माहिती देण्यांत आली.दुकानदार तीन लिटर केरोसिन देत असताना दोन लिटर नंतर देण्यांत येईल असे सांगुन लाभार्थाची फसवणुक करीत आहेत.

 महाड तालुक्या करीता तीन टॅकर मंजुर करण्यांत आले असुन त्या पैकी एक टॅकर केरोसिनचे वितरण करण्ंयात आले असल्याची माहिती महाड महसुल विभागातील पुरवठा विभागातील अव्वल कारकुनश्रीमती शहा यांनी सांगितले.महावितरण वैंपनीने दिलेल्या यादी प्रमाणे जरी केरोसिनचे वाटप होत असले तरी यांतील कांही गांवाचा वीज पुरवठा सुरु झाल्याने त्या गावांमध्ये केरोसिनचे वाटप करण्यांत येणार नसल्याचे सांगण्यांत आले.