रसायनी 

भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष  भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशाने निसर्ग वादळ ग्रस्तांना केंद्रीय कार्यकारणी ,महाराष्ट्र प्रदेश  यांच्यावतीने  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव अंबडवे ता. मंडणगड येथे करण्यात आले.

त्यानंतर रायगड जिल्ह्यामधील वादळ ग्रस्तांना सुद्धा जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे वाटप करण्यात आले.याबाबत वादळ ग्रस्तांकडून भारतीय बौद्ध महासभेबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री भिकाजी कांबळे , कोषाध्यक्ष विजय कांबळे , उपाध्यक्ष सुशील वाघमारे , मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष विजय खाडे , सचिव पंढरीनाथ कांबळे तसेच रत्नागिरी व रायगड जिल्हातील पदाधिकारी उपस्थित होते.

अवश्य वाचा

रत्नागिरीत मुसळधार पाऊस