Wednesday, May 19, 2021 | 01:21 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कमांडर क्रिकेट क्लब संघ विजयी
रायगड
01-Feb-2021 04:06 PM

रायगड

 । माणगाव । वार्ताहर ।

माणगाव एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या सौजन्याने श्री काळभैरव क्रिकेटक्लब रीळे संघाने रविवारी (दि.31) आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत कमांडर क्रिकेट क्लब बामणोली संघाने अंतिम सामन्यात न्यू चॅम्पियन बॉईज तळेगाव संघावर मात करीत प्रथम क्रमांकचे रोख पारितोषिक 10 हजार रुपये व आकर्षक चषक पटकाविला.सदर स्पर्धेत असोसिएशनचे 16 संघ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

माणगाव तालुक्यातील लहाने सुरव येथील मैदानावर श्री काळभैरव क्रिकेट क्लब रीळे यांनी स्पर्धेचे चांगल्या पद्धतीने आयोजन केले होते.या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे विजेते न्यू चॅम्पियन बॉईज तळेगाव संघास 7 हजार रुपये व आकर्षक चषक,तृतीय क्रमांकाचे विजेते युवराज इलेव्हन मुंढेवाडी दाखणे संघास 5 हजार रुपये व आकर्षक चषक,चतुर्थ क्रमांकाचे विजेते श्री समर्थ कृपा लहाने सुरव संघास 3 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.तसेच उत्कृष्ट फलंदाज न्यू चॅम्पियन बॉईज तळेगाव संघाचा खेळाडू दीपेश काप, उत्कृष्ट गोलंदाज श्री समर्थ कृपा लहाने सुरव संघाचा अभिषेक लहाने तर मालिकावीराचा बहुमान कमांडर क्रिकेट क्लब बामणोली संघाचा खेळाडू निलेश उभारे यांनी पटकावला. या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.स्पर्धेचे  विजय बक्कम व योगेश पवार यांनी मराठीतून धावते समालोचन केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top