Tuesday, April 13, 2021 | 12:19 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

जावठे क्रिक्रेट स्पर्धेत अष्टमी मोहल्ला संघाची बाजी
रायगड
03-Mar-2021 05:55 PM

रायगड

। कोलाड । वार्ताहर ।

नवतरूण विकास मित्रमंडळ जावठे यांच्या वतीने संपन्न झालेल्या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात रोह्यातील अष्टमी मोहल्ला संघाने जबरदस्त खेळ करून बाजी मारीत अंतिम विजेतेपद पटकावून जावठे चषकावर आपले नाव कोरले.

अतिशय भव्य स्वरूपात संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन महाड-माणगाव-पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष(राष्ट्रवादी) चंद्रशेखर खानविलकर यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. यावेळी निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संदीप जाधव, भाले ग्रा.पं.सरपंच विवेक खानविलकर, उपसरपंच सुचिता राणे, जावठे पो.पाटील वामण शेपोंडे, संतोष चिविलकर, प्रकाश शेपोंडे, अंबजी चिविलकर, संदीप राणे, नवतरूण विकास मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार चिविलकर, उपाध्यक्ष महेश शेपोंडे, सेक्रेटरी मंदार शेपोंडे, चेतन राणे, खजिनदार सुशील दिवेकर, प्रदीप शेपोंडे, सल्लागार विजय चोपडे, श्रीकांत राणे, निलेश कुर्ले, निलेश शिंदे, विकास कुर्ले, विनायक चिविलकर, प्रशांत चिविलकर आदी उपस्थित होते.

क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेतील गावदेवी बोरीवली या संघाने उपविजेतेपद पटकावले तर रियांश पहूर, नवतरूण विकास मित्र मंडळ जावठे या संघांनी अनुक्रमे तुतीय व चतुर्थ क्रमांक पटकावले. तर सर्वोत्कृष्ट फलंदाज फैजान अष्टमी, सर्वोत्कृष्ट गोलंदाज अमित शिर्के बोरीवली, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक शुभम शेपोंडे जावठे आदी खेळाडू व विजेतेसंघ यांना रोख रक्कमेची पारितोषिकं व चषक देऊन उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळ जावठे यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top