Saturday, March 06, 2021 | 01:20 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अर्णव इलेव्हन क्रिकेट क्लब तळेगाव संघास अंतिम विजेतेपद
रायगड
22-Feb-2021 06:06 PM

रायगड

माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव तालुक्यातील क्रिकेटचे भगवे वादळ न्यू चॅम्पियन बॉईज क्रिकेट क्लब तळेगाव संघाने दि.12 ते 15 फेब्रुवारी 2021 रोजी मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा तळेगाव येथील भव्य मैदानावर आयोजित केल्या होत्या.या स्पर्धेत अर्णव इलेव्हन क्रिकेट क्लब तळेगाव संघाने अंतिम सामन्यात महेर इलेव्हन टेमपाले संघाचा दारुण पराभव करीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये 50 हजार व आकर्षक चषक पटकावले.सदरील स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत स्टार क्रिकेटर कृष्णा सातपुते व उस्मान पटेल अर्णव इलेव्हन तळेगाव संघातून सहभागी झाले होते.त्यांचा खेळ पाहण्यासाठी क्रिकेट शौकिनांनी स्पर्धा ठिकाणी गर्दी केली होती.या स्पर्धेतील उपविजेेते महेर इलेव्हन टेमपाले संघास रोख रुपये 30 हजार व आकर्षक चषक,तृतीय क्रमांकाचे विजेते लोणेरे असोसिएशन क्रिकेट संघास रोख रुपये 11 हजार व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांकाचे विजेते नागाव क्रिकेट संघास रोख रुपये 11 हजार व आकर्षक चषक तसेच वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट फलंदाज  म्हणून  महेर इलेव्हन क्रिकेट क्लब टेमपाले संघाचा सलामीचा फलंदाज जुहेब,उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अर्णव एलेव्हन तळेगाव संघाचा द्रुतगती गोलंदाज रीहान तर स्पर्धेतील  सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिला जाणारा मलिकाविराचा बहुमान  लोणेरे  असोसिएशनचा सुरज म्हस्कर यांनी पटकाविला. या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top