Tuesday, April 13, 2021 | 01:51 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सायकलपटू डुकरे आणखी एक विक्रम
रायगड
21-Mar-2021 04:37 PM

रायगड

 

। नेरळ । प्रतिनिधी ।

  कर्जत तालुक्यातील आघाडीचे वकील अ‍ॅड.गजानन डुकरे यांनी 21 मार्च रोजी सायकालिंग राजगुरू भगतसिंग सुखदेव इंडियन फ्लॅग साईड वर्ल्ड अट्टेम्प स्पर्धेत 90 किलोमीटर अंतर विक्रमी वेळेत पार केले.दरम्यान,सायकालिंग स्पर्धेत लागोपाठ दुसर्‍यांदा  डुकरे यांनी आंतरराष्ट्रीय विक्रम केला आहे.

  सायकलपटू यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेत भारताचा तिरंगा सायकलला लावून सायकल चालवावी लागणार होती.26 जानेवारी 2021 रोजी झालेल्या त्या स्पर्धेत गजानन डुकरे यांनी 72 किलोमीटर एवढे अंतर विक्रमी वेळेत म्हणजे दोन तास 47 मिनिटात पूर्ण केले होते.हा डुकरे यांचा विक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद झाला होता.त्यानंतर रविवारी झालेल्या सायकलिंग राजगुरू भगत सिंग सुखदेव इंडियन फ्लॅग राईड वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट मध्ये भारतातून भाग घेत 90 किलोमीटरचे अंतर 3 तास 28 मिनिटात पूर्ण केले.90 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी आयोजक यांच्याकडून 10 तासात राईड पूर्ण करण्याचे उद्दिष्टे दिले होते आणि गाजन्म डुकरे यांनी हे अंतर अवघ्या 3 तास 28 मिनिटात यशस्वीरित्या पूर्ण केली.गजानन डुकरे यांनी रविवारी सकाळी 6 वाजता नेरळ येथील हुतात्मा चौकातून सायकलिंगला सुरुवात केली.हुतात्म्यांना अभिवादन करून आपल्या मित्र परिवारासह स्पर्धेला सुरुवात करणारे अँड.गजानन डुकरे यांनी नेरळ ते कर्जत अशा तीन फेर्‍या आणि शेवटची फेरी कर्जत ते वांगणी अशी मारत 90 किलोमीटरचे अंतर पार केले.सायकलला कापडी तिरंगा झेंडा लावून सायकल चालवणे हे अत्यंत जिकरीचे काम असते आणि ते काम 90 किलोमीटरच्या शर्यतीत लीलया पूर्ण करण्याचे काम डुकरे यांनी केले आहे.त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून 72 किलोमीटर अंतर आंतरराष्ट्रीय विक्रमासह पूर्ण केल्यानंतर दीड महिन्यांनी आणखी एक जागतिक दर्जाची स्पर्धा जिंकणारे डुकरे यांच्या जिद्दीला सलाम केला जात आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top