अलिबाग  

ऐन कोरोनाच्या तसेच चक्रीवादळाच्या संकटात नागरिकांना सढळ हस्ते मदत करत माणुसकीचे दर्शन घडविणार्‍या शेतकरी कामगार पक्षात रामराज येथील 80 शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने रामराज परिसरात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष वागळे, माजी पंचायत समिती सदस्य मदन शेळके, सरपंच हिराजी काष्टे, उपसरपंच गणेश धुमाळ, माजी सरपंच नितिन पालकर, अशोक खोत, नंदकुमार गावडे, नौशाद मुजावर, शैलेन्द्र हाडकर, प्रविण शिंदे, नथुराम वाघमारे, शरीक मुजावर, चंद्रकांत बामणे, युवा कार्यकर्ते विक्रांत वार्डे, संतोष झावरे, विनीत झावरे, सोहम वागळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.  

संकटाच्या काळात अलिबाग तालुक्यातील शिवसेनेचे नेते ना कुठे फिरकले, ना त्यांनी कोणाला मदत केली. विकासाच्या बाबतीतही शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी पुर्णताः निराशा केली. यामुळे रामराज येथील शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, युवा नेतृत्व चित्रलेखा पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेवून शेकापत प्रवेश केला.

यावेळी रविंद्र अष्टावकर, राजेंद्र अष्टावकर, अंकुश अष्टावकर, सतीश दिवकर, रूपेश दिवकर, प्रभाकर दिवकर, रमन दिवकर, हेमंत दिवकर, विलास तुळसुनकर, शैलजा तुळसुनकर, शेखर तुळसुनकर, दिनेश सुभेकर, विश्‍वास अष्टावकर, संदीप वेटकोळी, सचिन वेटकोळी, प्रताप वेटकोळी, गणेश मुंडे, दिपक वेटकोळी, नरेश दिवकर, नरेश अष्टावकर, श्रीकांत चोरगे, जयवंत चोरगे, स्वस्तिक चोरगे, विक्रांत कोळी, मंदार कोळी, संतोष तुळसुनकर, प्रथमेश वेटकोळी आदि 80 युवा आणि जेष्ठ कार्यकर्ते, महिलांनी जाहीर प्रवेश केला.

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन