रायगड
। पेण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल असोशिएशनतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हा पंच परीक्षेचा निकाल असोशिएशनच्या बैठकीत कोकण विभाग प्रमुख तथा बैठकीचे अध्यक्ष शदर कदम यांनी जाहीर केला.या परीक्षेत कुंदन गोरे, प्रथम क्रमांक खालापूर,दुसरा क्रमांक बब्रूवाहन गायकवाड हाशिवरे तर तिसरा क्रमांक यतीराज पाटील अलिबाग व चौथा क्रमांक धनश्री कानडे कर्जत तर पाचवा क्रमांक भरत पाटील बहिरीचापाडा यांनी मिळविला.
तब्बल 95 परीक्षार्थी यात उर्त्तीर्ण झाले. यावेळी मार्गदर्शन करताना कदम म्हणाले की,सर्व पदाधिकारी सदस्य यांनी गावपातळीवर स्पर्धा घेउन या खेळाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करावा.जेणेकरून तयार होणारे पुरुष व महिला खेळाडू आपल्या विभागाचे व जिल्हयाचे नाव उज्वल करतील. राज्य संघटनेचे सचिव दिपक मोकल म्हणाले की, ही आपली नव्याने तयार झालेली संघटना नावारूपाला येण्यासाठी सर्वानी संघ भावनेने काम करावे. तसेच क्रिडा महर्षी नथुरामभाऊ पाटील व राष्ट्रीय प्रशिक्षक शरद कदम यांचा आदर्श डोळयासमोर ठेउन काम करावे. दि. दहा जानेवारी रोजी राज्य पंच परीक्षा दहिवली येथील कोकण विद्यापीठ महाविद्यालयात आयोजीत करण्यात आली असल्याचे शरद कदम यांनी सांगितले.या परीक्षेसाठी केंद्र प्रमुख म्हणून कर्जत असोसिएशनचे अध्यक्ष मधुकर घारे यांची केंद्र प्रमुख तर केंद्राचे निरीक्षक म्हणून कोकण विभागाचे प्रमुख शरद कदम यांची नियुक्ती राज्यास असोणिएशनने निवड केली आहे.या मिटींगला पंच प्रमुख प्रसन्ना पाटील,सेक्रेटरी रविंद्र पाटील व अन्य पदाधिकारी महिला व पुरूष सदस्य उपस्थित होते.