Wednesday, May 19, 2021 | 01:11 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

जय महाराष्ट्र कोशिंबळे संघाला विजेतेपद
रायगड
28-Jan-2021 04:12 PM

रायगड

। माणगाव । वार्ताहर ।

माणगाव एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या सौजन्याने आडघरचा छावा क्रिकेट क्लब संघाने मंगळवारी (दि.26) आयोजित केलेल्या  मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब कोशिंबळे संघाने अंतिम सामन्यात श्री समर्थ कृपा लहाने सुरव संघावर मात करीत प्रथम क्रमांकचे रोख पारितोषिक 10 हजार रूपये व आकर्षक चषक पटकाविला. सदर स्पर्धेत असोसिएशनचे 16 संघ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

माणगाव तालुक्यातील लहाने सुरव येथील मैदानावर आडघरचा छावा  क्रिकेट क्लब यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत व्दितीय श्री समर्थ कृपा लहाने सुरव,तृतीय नाक्यावरचा कट्टा खरवली,चतुर्थ न्यू चॅम्पियन बॉईज तळेगाव या संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.तसेच वैयक्तिक पारितोषिकांमध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज जय महाराष्ट्र कोशिंबळे संघाचा खेळाडू जगदीश बक्कम,उत्कृष्ट गोलंदाज श्री समर्थ कृपा लहाने सुरव संघाचा अभिषेक लहाने तर मालिकावीराचा बहुमान जय महाराष्ट्र कोशिंबळे संघाचा खेळाडू राहुल बक्कम यांनी पटकावला.या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.स्पर्धेचे  विजय बक्कम व मिलिंद शिर्के यांनी मराठीतून धावते समालोचन केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top