Monday, January 18, 2021 | 03:19 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

अन्वय नाईककडून घेतलेल्या त्या 19 घरांचे काय झाले?
रायगड
07-Jan-2021 08:52 PM

रायगड

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अन्वय नाईक परिवाराकडून खरेदी केलेल्या मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील मालमत्तेसंदर्भात भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी डागत या सार्‍या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही बेनामी प्रॉपर्टी तर नाही ना ? असा सवालही सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई येथे भेट देत संर्पूण मालमत्तेची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी कोर्लई ग्रामपंचायतीची देखील झाडाझडती घेतली. त्यांनी सांगितले की, अन्वय नाईक यांच्या या 30 जमिनी ठाकरे, वायकर परिवाराने विकत घेतल्या. हा व्यवहार 21 मार्च 2014 रोजी पूर्ण झाला, त्याचे अ‍ॅग्रिमेंट ट्रान्सफर व सगळे पेपरवर्क पूर्ण झाले. परंतू या जमिनीवर 19 घरं ज्यांचे बांधकाम 550 स्क्वेअर फुट पासून 2500 स्क्वेअर फुट पर्यंतची 19 घरं अस्तित्वात होती/आहेत. असे ठाकरे व नाईक परिवाराची कागदपत्रांवरुन दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड्स पाहिल्यावर लक्षात येते की 2009-2010 पासून ही घरं त्या जमिनीवर अस्तित्वात आहेत. या 19 घरांचे एकुण बांधकाम 23500 स्क्वेअर फूट आहे, याचे ग्रामपंचायत, राज्य सरकारच्या रेडी रेकनर प्रमाणे मूल्य रुपये 5 कोटी 29 लाख होते. 21 मार्च 2014 रोजी अन्वय नाईक परिवाराकडून उद्धव ठाकरे परिवाराने या सर्व जमिनी घरांसह विकत घेतल्या, परंतु 13 नोव्हेंबर 2020 पर्यंत म्हणजेच आम्ही हा खुलासा करेपर्यंत ही घरं कै. अन्वय नाईकच्या नावाने ग्रामपंचायतीत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही बेनामी प्रॉपर्टी तर नाही ना ? असा सवालही सोमय्या यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही 5 कोटींची 19 घरं त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवल्याचे दिसत नसल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.

या संबंधी मुख्यमंत्री स्पष्टता करणार का? असा प्रश्‍न करतानाच सोमय्या पुढे ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड पाहताना 2019-2020, 2020-2021 चे जे प्रोसिडींग बूक, फॉर्म 8 व अन्य जे रोकॉर्ड्स आहेत त्यात स्पष्टता नाही, त्यात तारीख, केव्हा बैठका झाल्या याचा अधिकृत तपशीलात गोंधळ दिसत असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीत ही 19 घरं श्रीमती रश्मी ठाकरे यांच्या नावावर करावी असा ठराव 7 जून 2019 च्या तारखेचा असल्याचे भासवले जात आहे, परंतू तो व्यवहार अधिकृत 12 नोव्हेंबर 2020 नंतर झाला असल्याचे ग्रामसेवक व तलाठी यांनी अम्हाला सांगितले. याचा अर्थ अन्वय नाईकची 19 घरं हे ठाकरे परिवार 2014 ते 2020 म्हणजे 6 वर्ष बेनामी संपत्ती असल्याचे दिसून येते. दुसरा आणखीन एक प्रश्‍न उपस्थित होतो की, कै. अन्वय नाईक यांचा मृत्यू 2018 मध्ये झाला परंतू श्री उद्धव ठाकरे परिवाराच्या नावाने ही घरं करण्याचा अर्ज, ठराव, पैसे भरणे, अधिकृत करणे हा सर्व व्यवहार हे 2020 नोव्हेंबर मध्ये किंवा त्या काळामध्ये झाला याची कायदेशीर स्थिती काय? असा व्यवहार करण्यासाठी कै. अन्वय नाईकच्या मृत्यूनंतरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का? या संबंधीही स्पष्टता हवी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक परिवाराशी असलेल्या अर्थिक संबंधां विषयी स्पष्टता करावी असा प्रश्‍न भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top