Tuesday, January 26, 2021 | 07:42 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

रायगड जिल्ह्यात दहा ग्रामपंचायती बिनविरोध
रायगड
05-Jan-2021 05:47 PM

रायगड

 अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 840 जागांसाठी एक हजार 588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तब्बल 848 उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापायला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे. सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल करताना 840 जागांसाठी दोन हजार 436 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या दिवशी तब्बल 848 उमेदवारांनी निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेतली.

ऑनलाईन प्रक्रिया असल्याने त्यातच संथ गतीने चालणार्‍या इंटरनेटचा चांगलाच फटका बसल्याने सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक विभागाचा उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा कार्यक्रम होता. मात्र, ऑनलाईन प्रक्रियेमुळे आणि इंटरनेटच्या कासवगतीमुळे रात्री उशिरापर्यंत काम सुरु होते. 88 ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत.

पनवेल तालुक्यातील आकुर्ली, खानावले, माणगाव तालुक्यातील टेमपाले, लाखपले, महाड तालुक्यातील भेलोशी, आसनपोई, श्रीवर्धन तालुक्यातील कारीवणे, म्हसळा तालुक्यातील केलटे या ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. माणगाव तालुक्यातील देवळी व कर्जत तालुक्यातील हुमगाव या दोन ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एक जागेवर उमेदवारी अर्जच भरला गेला नव्हता. त्या जागा रिक्त राहिल्या. उर्वरित सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे एकूण दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. 15 जानेवारी रोजी 78 ग्रामपंचायतीमध्ये मतदान होईल.  

88  ग्रामपंचायतींमध्ये 311 प्रभागांमधून 840 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी एकूण 2  हजार 475  उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 39 अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले, तर 2 हजार 436 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यची अंतिम तारीख 4 जानेवारी होती. या कालावधीत अलिबाग तालुक्यात 57 , पेण 69 , पनवेल 252, उरण 64, कर्जत 111, रोहा 224, माणगाव 21, महाड 17, श्रीवर्धन 23, म्हसळा 10 अशा एकूण  848 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता अलिबाग तालुक्यात 80, पेण 110, पनवेल 432, उरण 172, कर्जत 181, रोहा 374, माणगाव 58, महाड 76, श्रीवर्धन 73, म्हसळा 32 असे एकूण 1588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top