Saturday, March 06, 2021 | 12:38 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

प्रदेश काँग्रेस राज्यात साजरी करणार बॅ. अंतुले यांची जयंती
रायगड
08-Feb-2021 10:49 PM

रायगड

माणिक जगताप यांच्या मागणीची

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली दखल

महाड | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि कोकणचे भाग्यविधाते बॅ.ए.आर. अंतुले यांची जयंती काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर साजरी करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष श्री .नाना पटोले यांनी घेतला आहे. तशा प्रकारच्या सूचना राज्यातील सर्व जिल्ह्यांतील काँग्रेस कमिट्यांना देण्यात आल्या आहेत. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. माणिक जगताप यांनी बॅ. अंतुले यांची जयंती पक्षाच्या वतीने राज्यभरात साजरी करण्याची मागणी श्री. पटोले यांच्याकडे केली होती.

आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत बॅ. अंतुले यांनी कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड करण्याचे त्याच प्रमाणे लातूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे काम केले होते. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापन करून हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनीच चालेल असा संदेश त्यांनी महाराष्ट्रात सर्वदूर दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडन येथून परत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. केंद्रात आरोग्य मंत्री म्हणून काम करताना पल्स पोलिओ लसीकरणाची राष्ट्रव्यापी मोहीम राबवून भारत पोलीओमुक्त करण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून राज्यातील निराधारांना आथिक आधार देण्याचे काम त्यांनी केले. स्वातंत्र्य चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देत हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात यासाठी राज्यभरात त्यांनी हुतात्मा स्मारके उभी केली.

बॅ. अंतुले हे जरी अल्पसंख्यांक समुदायातील असले तरी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी बहुजन समाजाचा कैवार घेत या समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केले होते. त्यामुळे आजही कोकणासह संपूर्ण देशात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

दुर्दैवाने या थोर लोकनेत्याची जयंती राज्य पातळीवर साजरी केली जात नाही. या लोकोत्तर नेत्याच्या विचारांचा वारसा जपला जावा, पक्षातील तरुण कार्यकर्त्यांना त्यांच्या पासून प्रेरणा मिळावी यासाठी प्रदेश काँग्रेसने राज्यभरात त्यांची जयंती साजरी करावी अशी मागणी श्री. जगताप यांनी श्री. नाना पटोले यांच्याकडे त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून केली.

या मागणीला तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत नाना पटोले यांनी ९ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा आणि तालुका कार्यालयात बॅ. ए.आर. अंतुले यांची जयंती साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top