Tuesday, April 13, 2021 | 01:38 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर कामे सुरु करा
रायगड
04-Apr-2021 06:26 PM

रायगड

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात गावे जोडणार्‍या पाच कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे. 8 कोटी रुपये कामांच्या निविदा नोव्हेंबर 2020 मध्ये मंजूर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जानेवारी महिन्यात मंजूर करण्यात आलेल्या निविदा लक्षात घेऊन आठ दिवसात कामे सुरु करावीत, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केली आहे. तसेच ही कामे येत्या आठ दिवसात सुरु न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात घारे यांनी दिला आहे.

कर्जत तालुक्यातील पाच रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 2019-20 या आर्थिक वर्षात प्रस्तावित केली होती. कर्जत तालुक्यातील गावे जोडणार्‍या सहा रस्त्यांची कामे मंजूर झाली होती. बोर्ले-जिते-कुंभे, चिंचवली-सालवड-नसरापूर तर खांडपे-तिवणे-सांडशी व बेडीसगाव, कोषाणे-वावे या पाच रस्त्यांच्या कामांना 8 कोटींचा निधी मंजूर झाला होता. शासनाने या कामांच्या निविदा नोव्हेंबर 2020 मध्ये काढल्या होत्या. त्यानंतर नवी मुंबई येथील सिद्धिविनायक कंन्स्ट्रक्शन या कंपनीला त्या कामांचा ठेका 3 जानेवारी 2021 रोजी ऑनलाईन पद्धतीने देण्यात आला होता. मात्र संबंधित ठेकेदाराने ठेका मिळालेल्या पाचपैकी कोणत्याही रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरणाची कामे सुरु केली नाहीत. त्यामुळे तोंडावर आलेला पावसाळा लक्षात घेता त्या-त्या गावातील लोकांना पुन्हा खड्डेमय रस्त्याने जावे लागणार आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्या सर्व रस्त्यांची कामे तात्काळ सुरु करण्याची मागणी केली आहे. 

ठेकेदाराचे दुर्लक्ष

रस्त्याच्या कामाची मंजुरी मिळवूनही ठेकेदाराकडून रस्त्यांची कामे सुरू झाली नाहीत. त्यामुळे या रस्त्यांवरून अनेक वर्षांपासून स्थानिकांना खड्डेमय रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. परिणामी, कर्जत तालुक्यातील त्या पाचही रस्त्यांची कामे सुरु झाली नाहीत तर आपण उपोषणाला बसू, असा इशारा रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top