Wednesday, May 19, 2021 | 02:42 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्याकडून सीसी सेंटरला 50 बेड
रायगड
26-Apr-2021 09:20 PM

रायगड

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या संस्थेच्या वतीने आरसीएफ कुरुळ कॉलनीमधील आरसीएफ स्कूल येथील कोरोना विलगीकरण सेंटरच्या 50 बेडस् जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्याकडे सोमवारी सुपूर्द करण्यात आले. 

शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रलेखा पाटील यांच्या संस्थेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी आरसीएफ स्कूलमधील विलगीकरण कक्षासाठी 50 बेडस् देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 25 ऑक्सिजनचा पुरवठा करणारे सिलेंडरसुद्धा देण्यात आले आहेत. या 25 ऑक्सिजन सिलेंडर रिफिल करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असणार आहे. त्याप्रमाणे 50 रुग्णांच्या आणि नातेवाईंकासाठी लागणारे जेवण पॅकेट स्वरुपात देण्याची तयारी देखील चित्रलेखा पाटील यांनी दाखवली आहे. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी या विलगीरकरणाच्या अस्वच्छता, दुरावस्थेकडे जिल्हा शल्यचिकित्सकांचे लक्ष वेधले. या कक्षासाठी डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. आवश्यक त्या परिचारीका व इतर कर्मचारी वर्ग पुरविण्याबाबतची विनंती यावेळी चित्रलेखा पाटील यांनी केली. यावेळी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ अनिल फुटाणे, लसीकरण प्रमुख डॉ गजानन गुंजकर, डॉ चंद्रशेखर साठये, डॉ राजाराम हुलवान, शेकापच्या आरोग्य सेलचे अशिष रानडे, विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते.

तोडकरी रुग्णालयातील विलगीकरण कक्ष आजपासून सुरु

रुग्णांचे हाल थांबविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून श्रीबाग येथील तोडकरी हॉस्पिटल अलिबाग येथे कोरोना रुग्णांसाठी सुसज्ज विलगीकरण कक्ष कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी उद्या मंगळवार दि. 26 एप्रिल रोजीपासून सुरु करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या परंतु कमी लक्षणे आणि कमी त्रास असणार्‍या रुग्णांना या विलगीकरण केंद्रामध्ये उपचार करण्यात येणार असल्याची माहिती चित्रलेखा पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top