Tuesday, April 13, 2021 | 01:28 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

काँग्रेसला गतवैभव प्रात्प करुन देणार - सत्यजित तांबे
रायगड
30-Mar-2021 03:08 PM

रायगड

अलिबाग । शहर प्रतिनिधी

एकेकाळी रायगड जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता, त्याला पुन्हा एका गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शनिवार, 27 मार्च रोजी काँग्रेस भवन अलिबाग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेत माणिक जगतापदेखील उपस्तित होते.

आमच्याकडून आम्ही कुठेतरी कमी पडलो जेणे करून ही परिस्थिती आता पक्षाची आहे; परंतु येणार्‍या काळामध्ये आम्ही त्यामध्ये सुधारणा करून केंद्र व राज्यामधील नेतृत्वच जास्तीत जास्त लक्ष कोकणाकडे कसे नेता येईल, कोकणच्या विकासाचे प्रश्‍न कसे मार्गी लावता येतील, याचा प्रयत्न करू. तसेच जे आमचे 12 मंत्री आहेत, महाराष्ट्रमध्ये त्यांच्या खात्यांचा वापर करून कशा पद्धतीने कोकणाचा विकास करता येईल, या उद्देशाने आमचा ठोस असा एक कार्यक्रम लवकर सुरु होईल, मंत्रीही आता सगळीकडे दौर्‍यावर येणार आहेत, जेणे करून वेगवेगळे प्रश्‍न सोडवण्यात येतील, त्या दृष्टीने आम्ही काम करू, अशी ग्वाही तांबे यांनी दिली.

10 ते 15 ठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून येऊ शकतात, कारण कोकणात आमच्याकडे तसे उमेदवार आहेत फक्त त्यांना प्रोत्साहन देण्याची थोडी गरज आहे आणि ते काम पक्ष नेतृत्व करेल, असा विश्‍वास यावेळी तांबे यांनी व्यक्त केला. या वेळेला त्यांनी स्थानिक युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शनही केले.

माणिक जगताप यांनीदेखील यावेळेला काँग्रेस पक्षाकडून 2019 च्या निवडणुकांमध्ये झालेल्या चुका मान्य केल्या. परंतु, पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून सक्षम उमेदवार निवडण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

येणार्‍या काळात रायगड आणि कोकणात काँग्रेस पक्षात बदल दिसेल. आमच्याकडे बंडखोरी जरी झाली असली, तरी कोणीही काँग्रेस पक्ष सोडलेला नाही.

- माणिक जगताप, उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top