Tuesday, January 26, 2021 | 09:06 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

पुगावच्या उपसरपंचपदी राम धुपकर बिनविरोध
रायगड
10-Jan-2021 03:16 PM

रायगड

खांब-रोहा | वार्ताहर

रोहा तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या पुगाव ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी विद्यमान सदस्य राम धुपकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ग्रा.पं. कार्यालयात संपन्न झालेल्या मासिक सभेत धुपकर यांची निवड करण्यात आली असून, पूर्वीच्या उपसरपंच आदिती झोलगे यांचा उपसरपंचपदाचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या पदाकरिता सदस्य राम धुपकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी सरपंच नेहा धुपकर, नारायण धनवी, तंटामुक्त समिती अध्यक्ष बबन म्हसकर, युवा कार्यकर्ते गणेश म्हसकर, रचना कलमकर, नीलम कलमकर, अनिता खामकर, देवता वाघमारे, गोरखनाथ देवकर, हरिश्‍चंद्र धुपकर, महादेव खामकर, संदीप मुंढे, संकेत सावंत, हरेश धुपकर, संदेश धुपकर, परशुराम धुपकर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपसरपंच राम धुपकर हे गेली अनेक वर्षे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात पुगाव गावासह विभागात युवा कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते उपसरपंचपदाला निश्‍चितच न्याय देऊन कार्य करतील व ग्रा.पं. विकासकामासाठी मोलाचे योगदान देतील, अशी प्रतिक्रिया येथील युवा कार्यकर्ते प्रमोद म्हसकर यांनी पत्रकारांना माहिती देताना व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, शंकर म्हसकर व पुगाव ग्रामस्थांनी अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top