Wednesday, May 19, 2021 | 01:42 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

शेकापचे धडाडीचे कार्यकर्ते सतीश पाटील यांचे निधन
रायगड
06-Apr-2021 05:06 PM

रायगड

। वाघ्रण । वार्ताहर ।

शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते सतीश मोरेश्‍वर पाटील यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाल्याने नारंगी, शिरवलीसह संपूर्ण खारेपाटात शोककळा पसरली.

अवघ्या 57 व्या वर्षी निधन झालेले सतीश मोरेश्‍वर पाटील हे मुळचे हाशिवरे, खारेपाट रांजणखार गावचे रहिवासी होते. परंतु ङ्गजय मल्हार पोल्ट्री फार्मफ या व्यवसायामुळे त्यांचे नवीन वसाहत शिरवली येथे कायम वास्तव्य होते. वडील मोरेश्‍वर पाटील वय 85 वर्षे, आई सुशिला पाटील, वय 80 वर्षे, पत्नी स्मिता पाटील वय वर्षे 53, मुलगा राहूल पाटील वय 27 वर्षे तसेच दिवंगत बंधू विजय पाटील यांची पत्नी व मुले अशा एकत्र परिवारात खेळीमेळीत व्यवसाय व राजकारण यांची घडी बसवून ते कार्यरत होते.

शेतकरी कामगार पक्षासाठी कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचे आ. जयंत पाटील, शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील, अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्याशी स्नेहाचे संबंध होते. माजी राज्यमंत्री मीनाक्षी ताईंना ते मोठ्या भगिनीसारखे मानायचे. पूर्ण पाटील कुटुंबियांना ते आदराने मानून राजकारणात मोठ्या निवडणुकीपासून ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत निष्ठेने कार्य करीत होते. खारेपाटातील पक्षाच्या बैठकादेखील त्यांच्याकडे होत असत.

त्यांच्या राजकारणातील निष्ठा आणि प्रामाणिकपणा म्हणून पत्नी स्मिता सतीश पाटील यांना सन 2018 च्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत सतीश पाटील यांच्या परोपकारी व आदरयुक्त स्वभावामुळे त्यांचा भरघोस मतांनी विजय झाला. स्मिता पाटील या  नारंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर आहेत. प्रत्येक माणसाला आदराने हाक मारणारा अजात शत्रू, मनमिळावू कार्यकर्ता हरपला, अशी प्रतिक्रिया खारेपाट शेतकरी कामगार पक्ष संघटनेचे वतीने प्रा. अनिल गोमा पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर एक सुस्वभावी आणि दानशूर कार्यकर्ता सोडून गेला, असे मत शिरवली सरपंच प्रमोद ठाकूर यांनी व्यक्त केले.

खारेपाट ग्रामपंचायत सरपंच ग्रुपकडून सतीश पाटील यांच्या जाण्याने शेकाप कार्यकर्त्यांना पोकळी जाणवेल असे मत व्यक्त केले आहे. यामध्ये पेढांबे, वाघ्रण, चिंचवली, नारंगी उपसरपंच, शिरवली, माणकुळे, हाशिवरे आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

अंदाजे 35 वर्षे शेकापचे कार्यकर्ते व सामाजिक कार्य करणारे, सर्वांशी मिळून राहणारे दादा, भाऊ, ताईंपासून, चित्रलेखा पाटील, चित्राताई पाटील यांच्यापर्यंत नाते जपणारे सतीश पाटील यांचे दिवस कार्य भुवनेश्‍वर येथे शुक्रवार दिनांक 16 एप्रिल रोजी होणार आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top