Wednesday, May 19, 2021 | 02:36 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांना तातडीने मदत द्या
रायगड
04-Mar-2021 08:26 PM

रायगड

मुंबई | प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात सन 2019-20 व 2020-21 या वर्षात झालेल्या क्यार व महाचक्रीवादळ, तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांच्या लहान व मोठ्या नौकांसह मच्छिमार साहित्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. मात्र, त्यांना अद्याप कुठल्याही प्रकारची मदत देण्यात आलेली नाही. ती तातडीने दिली जावी, अशी जोरदार मागणी आ. जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानपरिषदेत विशेष उल्लेखाद्वार केली आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नौकांचे तसेच मच्छिमार साहित्यांच्या नुकसानाची नुकसान भरपाई शासनाकडून अद्याप देण्यात आलेली नाही. त्यातच कोव्हिड-19 महामारीचे संकटाच्या वेळी मासेमारी बंदी, तसेच मच्छीची मरतूक कमी झाल्यामुळे मच्छिमारांवर आर्थिक संकट येऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे आ. पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

मासेमारीसाठी जाणार्‍या मच्छिमारांना जो खर्च येतो, त्यापेक्षा मिळणार्‍या मच्छीतून कमी उत्पन्न मिळत असल्यामुळे मच्छी पकडण्यासाठी होणार्‍या खर्चाचा भुर्दंड हा नौका मालकांना सोसावा लागतो. त्यामुळे मच्छिमारांना तातडने नुकसान भरपाई द्यावी.

- आ. जयंत पाटील

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top