Wednesday, May 19, 2021 | 02:30 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

शेकापच्या प्रयत्नाने विलगीकरण कक्षाची तयारी पुर्ण
रायगड
25-Apr-2021 05:38 PM

रायगड

दोन दिवसांत कक्ष सुरु करण्याचा चित्रलेखा पाटील यांचा मानस 

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. रुग्णांचे हाल थांबविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या संस्थेमार्फत श्रीबाग येथील तोडकरी हॉस्पिटल अलिबाग येथे कोरोना रुग्णांसाठी सुसज्ज असे विलगीकरण कक्ष उभारले आहे. शेकापच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तयारी पुर्ण झाली आहे. अद्ययावत असणार्‍या या केंद्राची रविवारी (दि.25) शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच शेकापक्षाच्या टिमचे कौतुक केले. 

यावेळी चित्रलेखा पाटील यांच्यासह शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, नागावचे माजी सरपंच नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर, माजी अध्यक्ष डॉ. विनायक पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ किरण नाबर, डॉ. प्रणाली पाटील आदी उपस्थित होते. 

अलिबागमधील तोडकरी रुग्णालयात 100 बेड्स, मोफत जेवण, पिण्याचे पाणी, औषणरे, खेळ आणि मनोरंजनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटात कोणतेही राजकारण न करता शेतकरी कामगार पक्षाने रुग्णांसाठी धाव घेत हा निर्णय घेतला. कोरानाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या संस्थेमार्फत  हा महत्वपुर्ण निर्णय घेतला आणि अवघ्या काही दिवसांतच तो पुर्णत्वास नेला. 

रुग्णालयात बेड उपलब्ध नसतील या भीतीने अनेकजण लागण झाल्यावरही घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे प्राथमिक स्वरुपाची लक्षणे आढळणार्‍या रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे संसर्ग कमी होण्यास निश्‍चितच मदत होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. 

 राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. तर ग्रामीण भागात रुग्णांना बेड मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीत रुग्णांना दिलासा मिळावा, त्यांचा जीव वाचावा, वेळेवर उपचार मिळावे याकरीता शेतकरी कामगार पक्षाच्या प्रयत्नातून तालुक्यातील रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारून या कठीण काळात आदर्श निर्माण केला आहे.

मोफत सेवा 

शेकापक्षातर्फे उभारण्यात आलेल्या या विलगीकरण कक्षात मिळणारी सेवा मोफत असणार आहे. विलगीकरण कक्षासाठी लागणारी जागा जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनी उपलब्ध करुन दिली आहे. त्याचप्रमाणे विलगीकरण कक्षामध्ये बेड तसेच आवश्यकता असेल तर ऑक्सिजन साठा सुध्दा उपलब्ध करुन ठेवला असल्याची माहिती चित्रलेखा पाटील यांनी दिली. 

कौतुकांचा वर्षाव 

विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. शेकापने केलेल्या प्रयत्नामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनीही समाधान व्यक्त केले आहे. तसेच या सेंटरमुळे रुग्णांवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असेही मत स्थानिकांनी व्यक्त करीत चित्रलेखा पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यामुळे लक्षणे आढळल्यास तपासणी करुन घ्यावी, तसेच या सेंटरमध्ये दाखल व्हावे. जेणेकरुन संसर्गाचा प्रसार होणार नाही. 

मनोरंजनासाठी विविध खेळ 

या विलगीकरण कक्षामध्ये 92 च्या खाली ऑक्सिजन पातळी असलेला रुग्ण ठेवला जाणार नाही. विलगीकरण कक्षामध्ये जेवण, चहा, पाणी, अल्पोपहार यांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. वैद्यकिय सेवेसाठी इंडियन मेडीकल असोसिएशनचे सर्व सदस्य, अलिबागमधील डॉक्टर्सची टिम तत्पर राहणार आहे. उपचारासोबतच रुग्णांचे मनोरंजन व्हावे, यासाठी या विलगीकरण कक्षामध्ये विरंगुळा कक्ष सुरु करुन त्यात टिव्ही, कॅरम, बुध्दीबळ, सापशिडी, ल्युडोसारख्या खेळांची देखील व्यवस्था केली आहे. 

 

सुविचारांमुळे सकारात्मक ऊर्जा

चित्रलेखा पाटील यांच्या संकल्पनेतून या विलगीकरण कक्षात ठिकठिकाणी सुविचार लावण्यात आले आहेत. सकारात्मक विचार दाखवणार्‍या या सुविचारांमुळे येथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या मानसिकतेत सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, असा विश्‍वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला. 

सुरुवातीलाच पुन्हा जिंकायची तयारी तिथुनच करायची, जिथून हरायची भीती जास्त वाटते. प्रवेश करतानाच हा सुविचार वाचूनच रुग्णाची भीती दुर होईल. त्याचबरोबर संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत. पंखावरती ठेव विश्‍वास, घे भरारी झोकात, कळू दे वेडया आकाशाला तुझी खरी औकात. आशा सोडायची नसते... निराश कधी व्हायचं नसतं... अमृत मिळत नाही... म्हणून विष कधी प्यायचं नसतं. कधीच म्हणून नका मला शक्य नाही. कारण ही एका पराभुताची मानसिकता आहे. मनात आणलं तर जगात अशक्य असं काहीच नाही. होईल सगळं ठिक! फक्त स्वतःला सांगत रहा की जे काही चालु आहे माझ्यासोबत ते फक्त थोडया वेळापुरतच आहे... अजून थोडे दिवस!, न हरता.. न थकता.. न थांबता.. प्रयत्न करणार्‍यांसमोर कधी कधी नशिबसुद्धा हरतं..., हिम्मत एवढी मोठी ठेवा की तिच्यासमोर नशिबाला झुकावे लागेल. उगिच आपण एकटे मानतो स्वतःला.. आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कुणीतरी. अशा प्रकारचे सुविचार ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. जे वाचून मनाला उभारी मिळते. 

कोरोनाचा संसर्ग झालेल्या परंतु कमी लक्षणे आणि कमी त्रास असणार्‍या अलिबागमधील ज्या रुग्णांकडे विलगीरकणासाठी स्वतंत्र खोली नसेल, स्वतंत्र सुविधा नसतील त्यांनी या विलगीकरण कक्षात दाखल व्हावे. जेणेकरुन त्यांच्यापासून इतर नातेवाईक व नागरिकांना संसर्ग होणार नाही.

- चित्रलेखा पाटील

शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top