पोलादपूर,

पोलादपूर नगरपंचायतीच्या औटघटकेच्या नगराध्यक्षपदासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून येत्या सोमवार 6 जुलै ते बुधवार दि. 8 जुलैपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात मुख्याधिकारी विराज लबडे हे उमेदवारी अर्ज स्विकारणार आहेत.  

आातापर्यंत पोलादपूर नगरपंचायतीच्या एकाही नगराध्यक्षाने आरक्षणानुसार विहित अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला नसून पाचव्या नगराध्यक्ष पदाची निवड ही चौथ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीवेळी ठरलेल्या पक्षसंघटनेच्या निर्णयानुसार होणार असून ती केवळ औपचारिकता ठरणार आहे. 13 जुलै 2020 रोजी पाचव्या नगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर तातडीने चौथ्या उपनगराध्यक्षांचीही निवड केली जाणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

पोलादपूर नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आणि तब्बल बारा नगरसेवक सभागृहात सत्ताधारी झाले. काँग्रेसचे पाच नगरसेवक असल्याने एका स्विकृत नगरसेवक पदासह विरोधी गटाची मान्यता मिळाली होती. पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसाधारण महिला नगराध्यक्षपद अश्‍विनी गांधी आणि सुनिता पार्टे यांना विभागून देण्यात आले. दोन्हीवेळी गटनेते उमेश पवार हे उपनगराध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. यादरम्यान, विरोधी पक्षाचे गटनेते नागेश पवार यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून पुन्हा निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसची विरोधी गटाची मान्यता रद्द होऊन स्विकृत नगरसेवकपदही रद्द झाले. यामुळे शिवसेनेमध्ये 13 नगरसेवक संख्या होऊन सत्तापदांसाठी रस्सीखेच वाढली. आणि नंतरची अडीच वर्षे नागरिकांचा मागास प्रवर्ग नगरसेवकासाठी राखीव असल्याने प्रथम निलेश सुतार व उपनगराध्यक्षपदी सिध्देश शेठ आणि त्यानंतर कोण या पेचावर नंतरच्या कालावधीमध्ये आधी नागेश पवार यांना नगराध्यक्ष आणि प्रकाश गायकवाड यांना उपनगराध्यक्ष त्यानंतर राजन ऊर्फ बच्चू पवार यांना नगराध्यक्ष आणि प्रसन्न बुटाला यांना उपनगराध्यक्ष करण्याचा निर्णय शिवसेना पक्षसंघटनेने घेतला. प्रकाश गायकवाड यांचा राजिनामा राजन पवार यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर 13 जुलैला घेण्यात येऊन त्याजागी प्रसन्ना बुटाला यांची निवड केली जाणार असल्याचे संघटनेकडून सांगितले जात आहे.
परिणामी, पोलादपूर नगरपंचायतीच्या आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची केवळ औपचारिकता उरली असून पाचवे नगराध्यक्षपद राजन पवार यांना मिळणार हे नक्की मानले जात आहे. मात्र, याच दरम्यान, शिवसेनेमध्ये अनेक अ