Tuesday, January 26, 2021 | 08:54 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

वरोधकांच्या भूलथापांना, प्रलोभनांना बळी पडून नये
रायगड
10-Jan-2021 08:12 PM

रायगड

रोहा, वार्ताहर

शेतकरी कामगार पक्षाने रोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे मतदारांनी भूलथापांना किंवा प्रलोभनांना बळी न पडता शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. शेकापला मत म्हणजे विकासाला मत असल्याने मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील यांनी केले. ते रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा आढावा व मतदारांची भेट घेण्यासाठी येथे आले होते.

शेकाप नेते पंडित पाटील यांनी रोहा तालुक्यातील शेणवई, वावे पोटगे तसेच शेडसई या ग्रामपंचायती मध्ये चालू असलेल्या प्रचाराचा आढावा घेऊन उमेदवार व मतदारांची भेट घेतली. या दौर्‍याला मतदारांनी उत्तम प्रतिसाद दिला.

निवडणुका आल्यानंतर आश्‍वासन देणारे तसेच हळदी व लग्न समारंभात भेटी देणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात कुठे गायब झाले होते, असा प्रश्‍न मतदारांनी विचारला पाहिजे.वीज बिल माफी आश्‍वासन, नोकर्‍या लावण्याचे आश्‍वासन याचे काय झाले? 26 गाव नळपाणी योजनेसाठी साडे पाच कोटी रुपयांचा निधी मी माझ्या कार्यकाळात मंजूर केला. या गोष्टीला दीड वर्ष झाले तरी देखील कामाला सुरुवात का नाही? रोहा-रेवदंडा तसेच रोहा-अलिबाग रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळून दोन वर्षे झाली तरी कामाला अद्याप सुरुवात नाही. लोकप्रतिनिधी निधी नसल्याची कारणे देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे, मग मंत्र्यांच्या मागे-पुढे पोलीस गाड्यांचा ताफा कशाला हवा? या प्रश्‍नाचा जाब मतदारांनी विचारला पाहिजे, असे आवाहन पंडित पाटील यांनी या दौर्‍याप्रसंगी मतदारांना केले आहे.

शेतकरी कामगार पक्षाने शेडसई, वावे पोटगे,शेणवई या ग्रामपंचायतींमध्ये विविध विकासकामे केली आहेत. मतदारांनी भूलथापांना किंवा प्रलोभनांना बळी न पडता शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. शेकापला मत म्हणजे विकासाला मत असल्याने मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असेदेखील पंडित पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी, कार्यालयीन चिटणीस जितेंद्र जोशी, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष जीवन देशमुख, अभिशेठ देशमुख, सुरेश देशमुख, लिंबाजी साखिळकर, शशिकांत कडू, अमोल शिंगरे, देवचंद म्हात्रे, तानाजी म्हात्रे, अभिजित शिंगरे, रघुनाथ कडू, रवींद्र झावरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रचार भेटीदरम्यान महिला वर्गाने मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top