Wednesday, December 02, 2020 | 11:22 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

सरपंचांवरील अविश्‍वास ठरावाला नवीन शेवा ग्रामसभेची मंजूरी
रायगड
12-Nov-2020 06:49 PM

रायगड

जेएनपीटी  

  शिवसेनेकडून चार वेळा सरपंच पद भूषविलेल्या जे.पी.म्हात्रे यांचा पराभव  करून थेट सरपंच म्हणून निवडून आलेले नविन शेवा गावाचे सरपंच निशांत घरत यांच्यावरच्या अविश्‍वास ठरावाला आज ग्रामसभेत मंजूरी देण्यात आली. अविश्‍वास ठरावाच्या बाजूने 629 ग्रामस्थांनी तर निशांत घरत यांच्या बाजून 302 लोकांनी मतदान केले. त्यामुळे साध्या बहुमताने अविश्‍वासाचा ठराव मंजूर झाला.

   ऑक्टोबर 2017 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत निशांत घरत यांनी अपक्ष निवडणूक लढवून चार वेळेला सरपंच पद भूषविलेल्या जे.पी. म्हात्रे यांचा आणि माजी आमदार मनोहर भोईर यांच्या पॅनलचा पराभव करून थेट सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या 8 सदस्यांनी त्यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल केला होता. 13 मार्च 2020 ला या अविश्‍वास ठरावावर मतदान होवून 10 पैकी 8 सदस्यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले होते.

 थेट सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंचावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्‍वास ठराव पारित केल्यास त्याला पुन्हा एकदा ग्रामसभेत मंजूरी घ्यावी लागते. मात्र कोव्हीडच्या पार्श्‍वभूमीवर हा अविश्‍वास ठराव ग्रामसभेत चर्चेला आला नाही. आज 12 नोहेंबरला यावर ग्रामसभेत मतदान झाले. मतदानासाठी सकाळ पासूनच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा वाजवत या निवडणूकीत ग्रामस्थांनी भरघोस मतदान केले. यावेळी अविश्‍वास ठरावाच्या बाजून 629, अविश्‍वास ठरावाच्या विरोधात 302 तर 64 मते बाद झाली. ग्रामसभेने अविश्‍वास ठराव बहूमताने मंजूर केल्याने आत्ता सरपंच निशांत घरत यांना पाय उतार व्हावे लागणार आहे. अविश्‍वास ठरावाच्या मोजणीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना, शेकाप, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top