Wednesday, December 02, 2020 | 11:48 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

माणगावमध्ये आज शेकाप पदाधिकार्‍यांची बैठक
रायगड
21-Nov-2020 07:20 PM

रायगड

माणगाव 

केंद्र सरकारच्या कृषी,कामगार विषयक धोरणांना विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या 26 नोव्हेंबरच्या भारत बंदची जोरदार तयारी शेकापतर्फे रायगड जिल्ह्यात सुरु आहे.त्या पार्श्‍वभूमीवर शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (22 नोव्हेंबर) सायंकाळी 6 वाजता माणगाव येथे प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

हायवेवरील ओपन हॉटेल,खरवली फाटा येथे होणार्‍या बैठकीला आम.बाळाराम पाटील, माजी आम.पंडित पाटील, धैर्यशील पाटील, जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील,जि.प.अध्यक्ष योगिता पारधी, ज्येष्ठ नेेत नानासाहेब सावंत, शेकाप मध्यवर्ती कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड.राजू कोरडे, अस्लम राऊत, जि.प.सदस्या  आरती रमेश मोरे, सुमन कुुंभार, पोलादपूर सभापती मंदाताई चांदे,तालुका चिटणीस रमेश मोरे, पोलादपूर तालका चिटणीस एकनाथ गायकवाड, श्रीवर्धन तालुका चिटणीस वसंत यादव, तळा तालुका चिटणीस धनराज गायकवाड,रोहा तालुका चिटणीस राजेश सानप,म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील,महाड तालुका चिटणीस गणेश सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top