महाड

भविष्यात तटकरेंच्या भ्रष्टाचाराला गाडून त्यांना माजी खासदार करण्याचे काम आपण करणार असा निर्धार करीत तटकरे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आपण त्यांच्या विरोधात लढून पराभूत करून दाखवू असे खुले आव्हान राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माणिक जगताप यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिले. लॉकडाऊन आणि निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीच्या वाटपातील पक्षपाती पणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माणिक जगताप यांच्यात जोरदार वादावादी सुरू झाली आहे. सुनील तटकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना माणिक जगताप यांनी तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.

ते म्हणाले गेली सहा महिने कोरोना महामारीच्या आजाराला बळी पडलेल्या आणि त्या पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे उध्वस्त झालेल्या जनतेला उभे करण्यासाठी व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रायगडच्या पालकमंत्री अपयशी ठरल्या उध्वस्त झालेल्या आपदग्रस्तांना अद्याप नुकसान भरपाई नाही काही गावामध्ये अजून ही वीज आली नाही ज्यावेळी आपण एखाद्या पदाचा हव्यास करतो त्यावेळी समाजाला न्याय देणे अपेक्षित असते मात्र पालकमंत्री रायगड च्या जनतेला न्याय देण्यात कमी पडल्या त्यांच्या कार्यपद्धतीवर आपण आक्षेप घेतला केंद्र सरकारच्या योजनेबद्दल आपण काहीही बोललो नाही असे असताना माणिक जगताप यांना आपण बेदखल करतो असे म्हणणाऱ्या खा सुनिल तटकरे यांना पत्रकार परिषद घेऊन माणिक जगतापांविरोधात अक्कलेचे तारे तोडावे लागतात त्यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे आहेत की सुनिल तटकरे असा प्रश्न पडतो पालकमंत्र्यांविरोधात बोललो तर बापाला राग येतो म्हणून आदिती बालक मंत्री आणि तटकरे पालकमंत्री असा टोला लगावत खा सुनिल तटकरें सारखा भ्रष्टाचारी नतद्रष्ट राजकारणी अख्ख्या महाराष्ट्रात भेटणार नाही असा घणाघाती आरोप महाडचे माजी आमदार तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिक जगताप यांनी केला

माणिक जगताप यांनी प्रत्येक वेळी आघाडीचा धर्म पाळला मात्र सुनिल तटकरेंशी ज्या ज्या वेळी मैत्री केली त्यावेळी त्यांच्यातील सुर्याजी पिसाळ जागा झाला माझी मदत मिळावी म्हणून तटकरेंनी शंभर वेळा माझे पाय धरलेत लोक सभा निवडणुकीच्या वेळी माणिक जगतापांचे नांव घेतल्याशिवाय पाण्याचा घोटही यांच्या घशाखाली जायचा नाही मात्र खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हेच तटकरे किती वेळा आपल्याकडे आले असा सवाल करीत आ गोगावले व तटकरेंची छुपी मैत्री होती हे लोकसभेला दिसले अनंत गीते सारख्या सज्जन सदाचारी निष्कलंक माणसाला पाडण्याचे पाप मी केले मात्र भविष्यात तटकरेंच्या भ्रष्टाचाराला गाडून त्यांना माजी खासदार करण्याचे काम आपण करणार असा निर्धार करीत तटकरे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आपण त्यांच्या विरोधात लढण्यास तयार आहोत असे खुले आव्हान जगताप यांनी तटकरेंना दिले 

बॅ ए आर अंतुले यांच्या नंतर स्वतःला कोकणचे तथाकथित भाग्यविधाते समजणाऱ्या खासदार तटकरे यांनी कोकणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे किती खासदार व आमदार निवडून आणले असा सवाल करीत खा तटकरे हे तथाकथित नेते हे त्यांच्या अर्ध्या कुटुंबापुरते शिल्लक राहीलेत त्यामुळे चिंतन करण्याची गरज माणिक जगतापला नसून सुनिल तटकरेंना आहे जिल्हा परिषद अध्यक्ष ते खासदारकी पर्यतच्या काळात किती पाप केले किती जणांना गंडवले ज्या ज्या मित्रांची मदत घेतली त्या पैकी किती सोबत आहेत याचे चिंतन करून समाधी घ्यावी असता सल्ला जगताप यांनी दिला

आ भरतशेठ गोगावले यांचा समाचार घेताना माणिक जगताप यांनी गीतें च्या पराभवामध्ये गोगावले यांचा वाटा असल्याचा आरोप केला आपण भाषण देतो हे तुम्ही मान्य केलेत मात्र तुम्ही राशन कुठून आणता हे जनतेला सांगा असा टोला हाणत कोरोनाची भिती नाही तर ढालकाठीला का राहात नाही माणिक जगताप महाड मध्येच राहतो असे सांगत, आजही काही भागा मधून लाईट आलेली नाही त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून आमदार व खासदार पुर्ण पणे अपयशी ठरले असल्याचे माणिक जगताप यांनी सांगीतले

ईडी कडून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी अद्याप संपलेली नाही आपण भाजपची सुपारी घेतली असे आरोप करणाऱ्यांनी ईडीची चौकशी टळावी यासाठी किरीट सोमय्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाय धरायला कोण गेले होते मुलाला निवडून आणण्यासाठी भाजप सेनेची मदत कुणी घेतली दिड दिवसाच्या सत्तेच्या पाठीमागे असणाऱ्या चौघांमध्ये तुमचेही नाव होते त्यामुळे भाजपमध्ये कोण जाणार हे जनतेने समजून घ्यावे माणिक जगताप हा छ शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व समभावाच्या विचारांशी व काँग्रेसच्या विचारधारेशी बांधिल असून कधीही जातीयवादाला स्पर्श करणार नाही असे जगताप यांनी स्पष्ट केले

 कोरोना महामारी च्या सुरुवातीच्या काळात मतदार संघातील जनतेला ज्यावेळी गरज होती त्यावेळी माणिक जगताप रस्त्यावर उतरुन मदत करीत होता खासदार व पालक मंत्री ३ महिने क्वारंटाईन होते २ दिवस मुंबई गोवा महामार्ग कशेडी घाटात दरड कोसळल्याने बंद पडला होता व पर्यायी असणारा तुळशी खिंड मार्ग बंद केला होता त्यावेळी खासदार कुठे होते दिलेल्या पदावर झोपा काढत होते का असता सवाल करीत माझी जबाबदारी समजून हा मार्ग सुरु करण्याचा प्रयत्न केला तर यांचा पोटशुल उठतो आघाडीचा घटक असल्याचे आपल्याला सांगितले जाते तेव्हा पालकमंत्री एकदाही आपल्याकडे फिरकल्या नाहीत आणि एकाही बैठकीला आपल्याला का बोलावले नाही सत्ता केवळ तुमच्या पोराबाळांसाठी आहे का असा सवाल करीत मी किती वाजता उठतो हा मुद्दा जुना झाला असून माझ्या उठण्याबसण्याची नोंद ठेवायला खासदार आणि आमदार माझ्या घरचे वॉचमन आहेत का अशी उपरोधित टिका जगताप यांनी केली चक्रीवादळात झालेल्या नुकसानी नंतर कोळी बांधवांचा तटकरे कुटुंबियांवर असणारा रोष सहन करावा लागू नये म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना श्रीवर्धन मध्ये आणावे लागले आणि त्यांच्या सदऱ्याआड खासदारांना का लपावे लागले असा सवाल जगताप यांनी केला

कारखाने बंद करण्याचा आपला निर्णय मागे घेतल्याचे सांगत कोणत्याही कामगारांचा  रोजगार आपण बुडवणार नाही या कारखान्यांमुळे अनेकांचे रोजगार सुरु असल्याची कोपरखळी लगावत विद्यमान आमदारांनी महाड औद्योगिक क्षेत्रात किती कामगारांना कोरोनाची लागण झाल्यावर कारखाने बंद करणार हे जाहीर करावे असे आवाहन माणिक जगताप यांनी केले

अवश्य वाचा