Tuesday, April 13, 2021 | 01:48 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

मालमत्ता कराबाबत ठोस निर्णय घ्या
रायगड
01-Apr-2021 08:38 PM

रायगड

पनवेल | प्रतिनिधी 

पनवेलम महापालिका  जोपर्यंत मालमत्ता कराबाबत विशेष सभेचे आयोजन करणार नाही तोपर्यंत विरोधी पक्षातील एकही नगरसेवक पालिकेच्या कुठल्याही सभेस हजर राहणार नाही व कुठली सभाही  घेऊ देणार नाही,असा इशारा  विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी  दिला आहे.

पनवेल पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा ही सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सभागृहात घेण्याची मागणी म्हात्रे यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालमत्ता कराबाबत सर्वसाधारण ठराव क्र.118 हा 17 जानेवारी 2019 रोजी सत्ताधारी 46 नगरसेवक विरुध्द विरोधी पक्षाचे  25 नगरसेवक अशा संख्याबळाने बहुमताने पारित करून घेण्यात आला.आघाडी म्हणून सदर मालमत्ता करास व ठरावास विरोधी पक्षाचा कायम विरोध राहिला आहे. 22 मार्च 2021 रोजी झालेल्या  सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या माध्यमातून मालमत्ता कराविरोधात आंदोलन करण्यात आले होतो. महासभेत सत्ताधार्‍यांची मालमत्ता कराबाबतची भूमिका स्पष्ठ करावी व त्यासाठी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाला वाचा फोडण्यासाठी विशेष महासभा आयोजित करावी, अशा प्रकारची विरोधी पक्षाकडून मागणी करण्यात आली होती.त्यानंतरच सभागृह सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे या सभेत तशा प्रकारचे तोंडी आश्‍वासन महासभेत देण्यात आले.असेही म्हात्रे यांनी या निवेदनात सुचित केले आहे.

24 मार्च 2021 रोजीची स्थायी समिती सभाही  विरोधीपक्षाच्या स्थायी समितीमधील सदस्य असलेल्या नगरसेवकांनी स्थगित करायला लावली.याकडेही प्रीतम म्हात्रे यांनी महापौरांचे लक्ष वेधले आहे.

या आधी कोवीडमध्ये झालेल्या प्रत्येक सभेला पत्रकार हजर असायचे. तसेच लोकसभा, विधानसभा यामध्ये विविध अधिवेशन होतात. त्यासाठी सर्व  सभासद  हजर असतात त्यामुळे आपण देखील ही विशेष सभा सत्ताधारी व विरोधक या  सदस्यांना विचारात घेऊन जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी  सभा थेट  घ्यावी.

प्रीतम म्हात्रे - विरोधी पक्षनेते

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top