Wednesday, May 19, 2021 | 01:59 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

वाढीव मालमत्ता कराला महाविकास आघाडीचा विरोध
रायगड
04-Apr-2021 07:49 PM

रायगड

पनवेल | वार्ताहर

पनवेल महापालिकेच्या प्रस्तावित मालमत्ता कर वाढीला शेकाप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस या महाविकास आघाडीचा ठाम विरोध असून,  सत्ताधारी भाजपने हा निर्णय मागे घेतला नाही तर त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शेकाप आमदार बाळाराम पाटील यांनी दिला आहे.

प्रस्तावित मालमत्ता कराला विरोध दर्शविण्यासाठी पनवेल येथे रविवारी महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बाळाराम पाटील यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.तसेच सत्ताधारी भाजपच्या कारभारावर कडाडून टीकाही केली

पनवेल महानगरपालिका 2016 साली अस्तित्वात आली. प्रथम सार्वत्रिक निवडणूक 23 मे 2017 साली झाली.या निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात पनवेल  महानगरपालिका हद्दीतील मतदाराना पुढील पाच वर्षे कोणताही मालमत्ता कर भरावा लागणार आहेत असे आश्‍वासन दिले होते. मतदार बंधू-भगिनींनी भाजपच्या फसव्या जाहीरनाम्यावर विश्‍वास ठेवून भरघोस मतांनी 78 पैकी 51 नगरसेवकांना निवडून देऊन 2/3 बहुमत दिले. परंतु सत्ताधारी भाजपने त्यांचा भ्रमनिरास केला आहे. असे  आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,  पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील,शिवसेनेचे बबनदादा  पाटील, काँग्रेसचे आर.सी.घरत, राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटिल, शेकापचे नगरसेवक रवी भगत, शंकर पाटील, गणेश कडू, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर,  कमल कदम,  प्रिया भोईर, प्रज्योति म्हात्रे,  उज्वला पाटिल, ज्ञानेश्‍वर पाटील, हेमराज म्हात्रे, सुदाम पाटील, लतिफ शेख, ताहिर पटेल, निर्मला म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, विजय पाटिल, नारायण घरत यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक सदस्य उपस्थित होते.

या वेळी नगरसेवक गणेश कडू यांनी  सत्ताधारी भाजपने कर वाढीच्या घेतलेल्या या ठरावाला महाविकास आघाडीच्या 27 नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता  परंतु बहुमताच्या जोरावर 46 विरुद्ध 25 नगरसेवकांनी हा ठराव मंजूर करून घेतला. सोमवारी होणार्‍या विशेष महासभेत आम्ही या ठरावाला विरोध करणार आहोत तसेच ही सभा सर्वांच्या उपस्थितीत घेण्यात यावी अशी मागणी केली,असे ते म्हणाले.  पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील ग्रामपंचायती ह्या शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात होत्या, त्यावेळी कोणताही कर नागरिकांवर लादला गेला नव्हता.याकडेही कडू यांनी लक्ष वेधले आहे.

सत्ताधारी  भाजपने  दिलेल्या आश्‍वासनाला 17 जानेवारी 2019 ठराव 118 अन्वये हरताळ फासला आहे.सत्ताधारी भाजपने घेतलेल्या या ठरावाला महाविकास आघाडीच्या 27 नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. 

आ.बाळाराम पाटील

जनतेवर लादलेल्या कराविरोधात महाविकास आघाडी आहे. पालिकेने कोणत्याही प्रकारची कर वाढ करू नये.  मालमत्ता कर हा अतिमहत्वाचा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आपण सर्व नगरसेवकांनी मिळून एकत्रित निर्णय घ्यावा,तसेच सोशल डिस्टंसिंग नियम पाळून सभा सभागृहातच घ्यावी तसेच वरील सभेत पत्रकारांना आमंत्रित करावे.

 प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते,

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top