Monday, January 18, 2021 | 03:21 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

कोकण होणार 'इनोव्हेटिव्ह रिजन'
रायगड
06-Jan-2021 07:12 PM

रायगड

मुंबई । वृत्तसंस्था ।

कोकण विभागास (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे) आंतरराष्ट्रीय नवोन्मेश (इनोव्हेशन) विभाग म्हणून विकसित करण्यासंदर्भात मुंबईतील राज्य सह्याद्री अतिथीगृहात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री अदिती तटकरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलतेची विपुलता असून जगाच्या पाठीवर संशोधन करणार्‍या भारतीयांपैकी अनेक जण कोकणातील आहेत. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ङ्गइनोव्हेटीव्हफ संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ङ्गइंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजनफ म्हणून विकसित करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज केली.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यशासन कोकणच्या शाश्‍वत विकासासाठी बांधिल असून शरद पवारसाहेबांच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल असा विश्‍वास बैठकीत व्यक्त केला. 

बैठकीत पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी ङ्गइंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजनफ संदर्भात सादरीकरण केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनीही इनोव्हेटीव्ह रिजनच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत कोकणच्या व राज्याच्या विकासासाठी संकल्पनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राला अनेक क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रयत्न होत असताना कोकणला ङ्गइंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजनफ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे. कोकणात त्यासाठी अनुकुल वातावरण आहे. कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलता प्रचंड आहे. मुंबई विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, मत्स्यविज्ञान संस्था याठिकाणी आहेत. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करुन घेत तेथील निसर्गाला हानी न पोचवता या विभागाचा विकास करणे शक्य आहे. पुढील 50-100 वर्षांचा विचार करुन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे असे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही या संकल्पनेचे सादरीकरण करुन त्यांच्या मान्यतेनंतर पुढे जावे अशी सूचनाही शरद पवार यांनी केली.

कोकणातील तिन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आजची बैठक होत आहे. तिन्ही मंत्री आणि राज्य सरकार कोकणचा ङ्गइंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजनफ विकास करण्यासाठी सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणानंतर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पर्यावरणाचा र्‍हास न करता कोकणचा विकास या माध्यमातून साधला जाणार आहे तसेच हा प्रकल्प राज्यासाठी भविष्यातील मोठी गुंतवणूक ठरेल असा विश्‍वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ङ्गइनोव्हेशनफ क्षेत्राचा विकास करताना राजकीय बंधन आणि दबावापासून मुक्त असले पाहिजे. त्यासाठी राज्याचे धोरण आवश्यक असल्याचेही सांगितले.

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top