अलिबाग

अलिबाग तालुक्यातील रेवस बोडणी येथील मच्छीमार जेटीच्या कामाला शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी मंजुरी मिळवून दिल्यानंतर ग्रामस्थांच्या आग्रहानुसार सदर जेटीच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. या कामाला मिळालेल्या गती मुळे मच्छिमार समाजाने समाधान व्यक्त केले आहे.

आमदार जयंत पाटील तसेच तत्कालीन आमदार पंडितशेठ पाटील यांनी आपल्या चिकाटीने, पाठपुराव्याने रेवस बोडणी मच्छिमार जनतेच्या हितासाठी मच्छिमार जेटीसाठी तब्बल  निधी मंजूर करून आणला. मच्छिमार बांधवांना समुद्रात बोटी टाकणे सोयीचे व्हावे तसेच एक सुरक्षित तळ मिळावा या हेतूने 2018 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारद्वयिनी हा प्रश्‍न मांडला. त्याचा पाठपुरावा केला.त्याचाच परिणाम म्हणून मच्छिमार जनतेचा हा मोठा प्रश्‍न निकालात निघाला. मच्छिमार जेटीचे बांधकाम,दुरुस्ती,आधुनिकीकरण या कामासाठीसाठी विकास निधी मंजूर केले गेले.

मात्र लोकडाऊन मुळे हे काम थांबले होते., त्यावर आमदार जयंत पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधत हे काम अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याचे निदर्शनास आणून देत या कामाला परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सदर कामाला वेग आला असून मच्छिमार समाजाने समाधान व्यक्त केले आहे. या जेटीच्या कामाला भेट देवुन पाहणी करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी आ जयंत पाटील यांच्याकडे धरला होता त्यानुसार जयंत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी अनेक मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी राजिपचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, मल्हारी मार्तंड सहकारी मच्छिमार सोसायटीचे चेअरमन विश्‍वास नाखवा, संचालक तुळशीराम नाखवा, राजेश नाखवा, दत्तगुरू नाखवा, बालनाथ कोळी, रोशन नाखवा, गायनी नाखवा, हरिश्‍चंद्र नाखवा, दिलीप नाखवा, धनाजी तांडेल, उत्तम तांडेल, जयवंत कोळी, श्रीराम नाखवा, बोदानी, अशोक भाई,  रेवस ग्रामपंचायतिचे उपसरपंच दिपक पाटील, परशुराम नाखवा, तुषार नाखवा, ओंकार नाखवा आदी उपस्थित होते.
लवकरच मच्छिमार बांधवांना सुरक्षित आणि आधुनिक जेटीचा लाभ घेता येणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण दिसत आहे.